rahul-gandhi-questions-narendra-modi  sarkarnama
देश

Rahul Gandhi: पंतप्रधान मोदी उद्या मणिपूरच्या दौऱ्यावर! राहुल गांधींनी डिवचलं, म्हणाले, आता मुख्य मुद्दा....

Rahul Gandhi on PM Manipur Visit : दोन समाजातील संघर्षातून मणिपूर दीड वर्षे सातत्यानं पेटता राहिला, यामध्ये महिला अत्याचारांच्या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून टाकलं होतं. त्यावेळी PM मोदींनी मणिपूरला भेट दिली नव्हती आता ते मणिपूरला भेट देणार आहेत.

Amit Ujagare

Rahul Gandhi: मणिपूरमध्ये गेल्या दोन वर्षांपासून अजूनही अधुनमधून धुमसतं आहे. दोन समाजांमध्ये झालेल्या संघर्षात पेटलेला मणिपूर दीड वर्षे सातत्यानं पेटता राहिला, यामध्ये महिला अत्याचारांच्या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून टाकलं होतं. पण त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला भेट दिली नव्हती आता ते मणिपूरला भेट देणार आहेत.

उद्या ते अधिकृतरित्या मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. पण मोदींच्या या दौऱ्यावर विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. आता हा मुख्य मुद्दा राहिलेला नाही, तर मुख्य मुद्दा सध्या वेगळाच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

माध्यांच्या प्रतिनिधींनी राहुल गांधींनी मोदींच्या मणिपूर दौऱ्याबाबत विचारणा केली. त्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, "मणिपूरमध्ये बऱ्याच काळापासून इश्यू आहे, आता कुठे पंतप्रधान तिकडे जायला निघाले आहेत ठीक आहे. पण मुख्य मुद्दा सध्या देशात मत चोरीचा आहे. हरयाणा, महाराष्ट्रात निवडणूक चोरली गेली. महाराष्ट्रात आम्ही हे दाखवून दिलं आहे. त्यामुळं मुख्य मुद्दा तर देशात सध्या मत चोरीचा आहे. सगळीकडं सध्या लोक हेच म्हणत आहेत वोट चोर"

मोदींचा दौरा कसा असेल?

दरम्यान, कुकी आणि मतैई समजात भडकलेल्या भीषण हिंसाचाराच्या मालिकेनंतर पंतप्रधान दोन वर्षांनंतर मणिपूरला जाणार असल्यानं प्रशासनाकडूनही मोठी सुरक्षा व्यवस्था तसंच स्वागतासाठी जय्यत तयारीही करण्यात आली आहे. कुकी बहुल चुराचंदपूर इथं पंतप्रधान 7 हजार 300 कोटी रुपयांच्या विकास योजनांची पायाभरणी करणार आहेत. त्याचप्रमाणे मैतेई बहुल इम्फाळमध्येही सुमारे 1200 कोटी रुपयांच्या विविध योजनांचे लोकार्पण करणार आहेत. चुरांदपूरला दुपारी 12.30 वाजता आणि दुपारी अडीच वाजता इम्फाळमध्ये पंतप्रधानांचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याआधी ते मिझोरामचा दौरा करणार आहेत. मणिपूरमधून ते आसामला जाणार आहेत, नंतर पश्चिम बंगाल आणि बिहारमध्येही पुढील तीन दिवसांत पंतप्रधान मोदींचे दौरे होणार आहेत. मात्र, त्यांचा मणिपूर दौराच सर्वाधिक चर्चेत असणार आहे.

कडक सुरक्षा व्यवस्था

मोदींच्या दौऱ्यामुळे मणिपूर सरकारनं राज्यात कडेकोड सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. चुरांदपूर येथील शांती मैदान आणि इम्फाळमधील कांगला पोर्टवर सुरक्षा यंत्रणांकडून तयारी करण्यात आली आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची तपासणी करूनच त्यांना सोडण्यात येणार आहे. तसेच कोणत्या वस्तू सोबत आणू नये, याची यादीच जाहीर करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT