Rahul Gandhi Popularity in Survey :
Rahul Gandhi Popularity in Survey : Sarkarnama
देश

Rahul Gandhi Popularity : राहुल गांधींची लोकप्रियता वाढली; भारत जोडो यात्रेचा करिश्मा..

सरकारनामा ब्यूरो

Rahul Gandhi News : देशातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही पहिल्या क्रमांकावर आहेत. मात्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचीही लोकप्रियता वाढताना आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्यानंतर राहुल गांधींना दुसऱ्या क्रमांकाची पसंती मिळावली आहे.

हे सर्वेक्षण एनडीटीव्हीने सीएसडीएस या संस्थेच्या सहकार्याने केले आहे. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 19 राज्यांमध्ये 10 ते 19 मे दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले.

कर्नाटकातील दारूण पराभवानंतर भाजपसाठी दिलासा देणारी बाब आहे की, मोदी सरकारला केंद्रात तिसऱ्यांदा संधी मिळावी, असे सर्वेक्षणात सहभागी असलेल्या सुमारे 43 टक्के लोकांचे मत आहे. मात्र त्याच वेळी 38 टक्के लोकांनी मात्र मोदी सरकारला नापसंती दर्शवली.

काँग्रेसच्या स्थितीत सुधारणा :

आज निवडणुका झाल्या तर काँग्रेसची स्थिती सुधारताना दिसत आहे. या सर्वेक्षणात सहभागी 29 टक्के लोक काँग्रेस पक्षाला मतदान करण्याच्या बाजूने आहेत. त्याचवेळी, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील सर्वात मोठ्या पक्षाला केवळ 19 टक्के मते मिळाली होती. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत परिस्थिती सुधारताना दिसत आहे. यूपीएबद्दल बोलायचे झाले तर गेल्या निवडणुकीत त्यांना 26.1 टक्के मते मिळाली होती. या युतीचा भाजपचा पराभव झाला.

राहुल गांधींची लोकप्रियताही वाढली :

एनडीटीव्ही आणि सीएसडीएसच्या सर्वेक्षणानुसार, "आज निवडणुका झाल्या तर ४३ टक्के लोक पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पसंती दिली आहे. ​ ही भाजपसाठी दिलासा देणारी बाब आहे. मात्र, या सर्वेक्षणात काँग्रेससाठीही आनंदाची बातमी आहे. राहुल गांधींची लोकप्रियताही वाढली आहे. सर्व्हेनुसार 27 टक्के लोकांचा वाटतं की, जर आज निवडणुका झाल्या तर राहुल गांधी देशाचे पंतप्रधान बनतील. 2019 मध्ये हा आकडा 24 टक्के होता. गेल्या चार वर्षांत त्यात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे.

भारत जोडो यात्रा :

राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेचे एक कारण म्हणजे त्यांची 'भारत जोडो यात्रा'. सर्वेक्षणात सामील असलेल्या लोकांपैकी 26 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, त्यांनी राहुल गांधींना नेहमीच पसंती दिली आहे. दुसरीकडे, 15 टक्के लोकांनी भारत जोडो यात्रेनंतर त्यांनी राहुल गांधी यांना पसंती देण्यास सुरुवात केली आहे. 16 टक्के लोकांना राहुल गांधी आवडत नाहीत. 27 टक्के लोकांनी कोणतेही मत व्यक्त केले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT