Chhattisgarh News: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी छत्तीसगढ येथील बीजापूर जिल्ह्यात घडलेल्या भयानक नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती शोक व्यक्त केला. शिवाय यावरून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राखण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
राहुल गांधींनी (Rahul Gandhi) म्हटले आहे की, अशाप्रकारच्या वाढत्या घटना राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राखण्यासाठीच्या सरकारच्या क्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही शोक व्यक्त केला आहे. खर्गेंनी असेही म्हटले की, केंद्र आणि राज्य सरकारला अशाप्रकारची संकटं कायमची संपवण्यासाठी अधिक सक्रीय होणे आवश्यक आहे, जेणेकरून जवानांचा जीव धोक्यात पडणार नाही.
छत्तीसगढमधील बीजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी (Naxal) जवळपास 60-70 किलो वजनाच्या एका आयडीचा वापर करून नक्षलविरोधी मोहिमेवरून परतणाऱ्या जवानांचे वाहन स्फोटाने उडवून दिले. ज्यामध्ये आठ जवान शहीद झाले शिवाय त्यांच्या वाहन चालकाचाही मृत्यू झाला.
नक्षली हल्ल्यतील जवानांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त करत राहुल गांधी म्हणाले, बीजापूरमध्ये भ्याड नक्षली हल्ल्यात आपले अनेक जवान आणि एक चालक शहीद झाल्याची, बातमी ऐकून खूप दु:ख झाले. मी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो. तसेच त्यांनी शोकग्रस्त कुटुंबीयांप्रतीही संवेदना व्यक्त केल्या आणि म्हटले की, संपूर्ण देश दहशत आणि हिंसेच्या विरोधात एकवटला आहे. सैनिकांच्या हौतात्म्याचे प्रमाण वाढल्याने राष्ट्रीय सुरक्षा राखण्याच्या सरकारच्या क्षमतेवर गंभीर प्रश्न निर्माण होतात.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनीही या हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, बीजापूरमध्ये झालेल्या नक्षली हल्ल्याने मी अतिशय दु:खी आहे. जिथे आठ शूर जवानांना आणि एका चालकास जीव गमावावा लागला. नक्षलवाद लोकशाहीसाठी एक गंभीर धोका आहे आणि त्याला कोणतेही स्थान नाही.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.