बातमीत महत्वाचे काय?
प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात हरियाणातील जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँर्जिंग प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे.
राहुल गांधींनी ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करत वाड्रा कुटुंबाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर भूमिका मांडली आहे.
राहुल गांधींनी वाड्रा कुटुंब हे दहा वर्षांपासून छळ सहन करत असून सत्याचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
Timeline of Allegations Against Robert Vadra : वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा चांगलेच अडचणीत आले आहेत. एका मनी लाँर्डिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. आपला मेव्हणा अडचणीत आल्याचे पाहून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांच्यासाठी धावून आले आहेत.
राहुल गांधींनी शुक्रवारी सोशल मीडियात एक पोस्ट करत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. हा राजकीय बदला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राजकीय हेतूने प्रेरित ही कारवाई असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मागील दहा वर्षांपासून वाड्रा कुटुंब राजकीय बदल्याचा त्रास सहन करत असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे.
हरियाणातील शिकोहपूर येथील जमीन व्यवहाराशीसंबंधित एका प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ईडीनेही या प्रकरणाचा तपास हाती घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांची ईडी कार्यालयात कसून चौकशीही करण्यात आली होती. त्यानंतर नुकतेच वाड्रा यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
त्यावर राहुल यांनी सोशल मीडियात म्हटले आहे की, सरकारकडून माझ्या मेव्हण्याला सतत दहा वर्षांपासून लक्ष्य केले जात आहे. हे ताजे आरोपपत्र त्याच राजकीय बदल्यातील पुढचा भाग आहे. मी रॉबर्ट, प्रियांका आणि त्यांच्यासोबत उभा आहे. ते पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या प्रेरित, अपशब्द आणि छळाचा सामना करत आहेत.
राहुल गांधींनी सत्याचाच विजय होईल, असाही विश्वास व्यक्त केला आहे. वाड्रा कुटुंब या कठीण काळात हिंमतीने सामना करेल, असा मला विश्वास आहे. कोणताही छळ सहन करण्यासाठी त्यांच्यात तेवढी हिंमत आहे. आपली प्रतिष्ठा जपत ते असे करत राहतील. शेवटी सत्याचाच विजय होईल, असे राहुल यांनी म्हटले आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
प्रश्न: रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात कोणत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले आहे?
उत्तर: हरियाणातील शिकोहपूर येथील जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँर्डिंग प्रकरणात.
प्रश्न: रॉबर्ट वाड्रा कोणाचे नातेसंबंधी आहेत?
उत्तर: ते प्रियांका गांधी यांचे पती आणि राहुल गांधी यांचे मेव्हणे आहेत.
प्रश्न: राहुल गांधींनी या कारवाईबद्दल काय प्रतिक्रिया दिली?
उत्तर: त्यांनी ही कारवाई राजकीय बदला असल्याचा आरोप केला.
प्रश्न: राहुल गांधींचा रॉबर्ट वाड्रा यांच्याबाबत काय विश्वास आहे?
उत्तर: त्यांनी म्हटले की, वाड्रा कुटुंब यातून सन्मानाने निघेल आणि सत्याचाच विजय होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.