Bhaskar Jadhav News : अश्लील, अर्वाच्य... होय, मी चुकलो! कबुली देत भास्कर जाधवांनी जाहिरपणे मागितली अध्यक्षांची माफी...

Bhaskar Jadhav’s Apology to Rahul Narwekar Explained : शिवसेना नेते व मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. गुरुवारी उपमुख्यमंत्री शिंदे सभागृहामध्ये उपस्थित असताना आदित्य ठाकरे यांनी वादग्रस्त विधाने, हातवारे केल्याचा आरोप देसाईंनी केला.
Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhavsarkarnama
Published on
Updated on

बातमीत थोडक्यात महत्वाचे :

  1. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांच्या कथित अर्वाच्य भाषेवरून विधानसभेत जोरदार वाद झाला आणि त्यांच्यावर तीन मंत्र्यांनी आक्षेप घेतला.

  2. शंभूराज देसाई, दादा भूसे आणि आशिष शेलार यांनी कारवाईची मागणी केली.

  3. भास्कर जाधव यांनी सभागृहात माफी मागत चूक मान्य केली, त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विषयावर पडदा टाकण्याचे आवाहन करून चर्चा संपवली.

Assembly Session : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या विधानांचे जोरदार पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले. त्यांनी सभागृहासह मीडियाशी बोलतानाही त्यांनी अर्वाच्य आणि अश्लील भाषा, हावभाव केल्याचा आरोप तीन मंत्र्यांनी आज केले. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर जाधवांनी चुकीची कबुली देत माफी मागितली आहे.

शिवसेना नेते व मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. गुरुवारी उपमुख्यमंत्री शिंदे सभागृहामध्ये उपस्थित असताना आदित्य ठाकरे यांनी वादग्रस्त विधाने, हातवारे केल्याचा आरोप देसाईंनी केला. तर जाधव आणि ठाकरेंनी मीडियाशी बोलताना अध्यक्षांबाबत अर्वाच्य भाषा वापरल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्याची मागणी देसाईंनी अध्यक्षांकडे केली.

मंत्री दादा भूसे यांनीही दोन्ही नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. अजून काही जणांचे दुधाचे दात पडले नाहीत, अशा शब्दांत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांनी हातवारे, भाषा अश्लील होती, अशी टीकाही त्यांनी केली. मत्री आशिष शेलार यांनीही दोन्ही नेत्यांवर टीकास्त्र सोडलं. माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून अशी वागणूक अपेक्षित नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच भास्कर जाधव यांनी माफी मागून यावर पडदा टाकण्याची विनंतीही त्यांनी केली.

Bhaskar Jadhav
Assembly Session : राड्यानंतर अजितदादा, जयंतरावांनी अध्यक्षांना सुचवला ‘कडक’ पर्याय; राहुल नार्वेकर कारवाईबाबत करणार मोठी घोषणा...

मंत्र्यांच्या निवेदनानंतर भास्कर जाधव यांनीही काल झालेल्या प्रकाराबाबत खंत व्यक्त केली. सभागृहात मी जे काही बोललो, त्याविषयी काय शिक्षा करायची ती तुम्ही करावी, असे जाधव म्हणाले. तर मीडियाशी बोलताना अध्यक्षांविषयी मी जे बोललो, ते बोलायला नको होते, असे सांगत त्यांनी आपली चूक झाल्याची कबुली दिली.

Bhaskar Jadhav
Rohit Pawar: बीडनंतर आता सांगलीत नवा आका तयार होतोय! त्याला वेळीच आवरा! रोहित पवार सरकारवर भडकले

मी जे काही बोललो ते घरी जाऊन पाहिले. त्यावेळी मला माझी चूक कळाल्याचे जाधव म्हणाले. त्यामुळे मी त्याबाबत माफी मागतो आणि दिलगिरीही व्यक्त करतो. तसेच त्यानंतरही अध्यक्षांना माझ्यावर काही कारवाई करायची असेल तर करावी, मी ती मान्य करेन, असेही जाधव म्हणाले. त्यानंतर अध्यक्ष नार्वेकर यांनीही जाधव यांनी मांडलेली भूमिका सभागृहाने मान्य करून पुढे जावे, अशी विनंती सभागृहाला केली आणि वादावर पडदा टाकला.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

  1. प्रश्न: कोणत्या नेत्यांवर अश्लील भाषा वापरण्याचा आरोप झाला?
    उत्तर: भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर.

  2. प्रश्न: कोणत्या मंत्र्यांनी या मुद्यावर टीका केली?
    उत्तर: शंभूराज देसाई, दादा भूसे आणि आशिष शेलार यांनी.

  3. प्रश्न: भास्कर जाधव यांनी काय भूमिका घेतली?
    उत्तर: त्यांनी चूक मान्य करून माफी मागितली आणि कारवाईसाठी तयार असल्याचे सांगितले.

  4. प्रश्न: अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणावर काय निर्णय घेतला?
    उत्तर: जाधव यांची माफी मान्य करत विषयावर पडदा टाकण्याचे आवाहन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com