Siddaramaiah Rahul Gandhi DK Shivakumar  sarkarnama
देश

Congress Politics : राहुल गांधींनी कर्नाटकचा तिढा सोडवला, काँग्रेस हायकमांडचं डी.के.शिवकुमार यांना अखेर अभय!

Rahul Gandhi Congress DK Shivakumar : मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे गुरुवार-शुक्रवार असे दोन दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी राहुल गांधींची भेट घेतल्याची माहिती आहे.

Roshan More

Congress News : गेले काही दिवस कर्नाटक काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. 'एक व्यक्ती एक पद' हे धोरण असताना देखील उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे त्यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडावे,यासाठी काँग्रेसमधील काही आमदारांचा गट आक्रमक झाला होता.

मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे गुरुवार-शुक्रवार असे दोन दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी राहुल गांधींची भेट घेतल्याची माहिती आहे. राहुल गांधींना कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवण्यात यश आले असून डी के शिवकुमार यांचे प्रदेशाध्यक्षपद कायम राहणार आहे.

डी के शिवकुमार हे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी काँग्रेसला विजय मिळवून दिला. त्यांच्यामुळे काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची रिस्क काँग्रेस घेत नसल्याची माहिती आहे. भाजपकडून काँग्रेस आमदारांना अमिष दाखवून फोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्या विरोधात दोन हात करण्याची ताकद ही डीके शिवकुमारांमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष ठेवण्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठींना हरकत नसल्याचे समजते.

विधान परिषदेची तयारी

कर्नाटक विधान परिषदेची निवडणूक लवकरच होणार आहे. काँग्रेसच्या दृष्टिने ही महत्वाची निवडणूक असून काँग्रेस आमदाराची एकजुट दाखवण्याचीही संधी आहे. त्यामुळे विधान परिषदेचे उमेदवा निवडण्याची जबाबादारी सिद्धारामय्या आणि शिवकुमार यांच्याकडे देण्यात आली आहे.

'त्या' प्रकरणावर राहुल गांधी नाराज

काँग्रेसच्या आमदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचे प्रयत्न केले जात आहे, असा आरोप काँग्रेस मंत्र्यानेच कर्नाटक विधानसभेत केला होता. हा प्रश्न विधानसभेत उपस्थित न करता योग्य पद्धतीने हातळला जाऊ शकला असता, असे राहुल गांधींचे मत आहे. त्यावरून राहुल यांनी नाराजी देखील व्यक्त केल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT