Rahul Gandhi shared a romantic photo of Riteish Deshmukh and Genelia D'Souza on his Instagram story. The photo has brought his old statement about his parents back into the spotlight. Sarkarnama
देश

Rahul Gandhi : राहुल गांधींनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला रितेश-जेनेलियाचा रोमँटिक फोटो; नेमकं कारण काय?

Rahul Gandhi shares Riteish and Genelias photo : खुद्द राहुल गांधी यांनी रितेश आणि जेनेलिया यांचा रोमँटिक फोटो शेअर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण राहुल यांनी या दोघांचा फोटो का शेअर केला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, या फोटोला त्यांच्या एका जुन्या वक्तव्याची किनार आहे.

Jagdish Patil

Rahul Gandhi Instagram Story : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख आणि सून अभिनेत्री जेनेलिया डिसूझा यांचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

खुद्द राहुल गांधी यांनी रितेश आणि जेनेलिया यांचा रोमँटिक फोटो शेअर केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण राहुल यांनी या दोघांचा फोटो का शेअर केला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, या फोटोला त्यांच्या एका जुन्या वक्तव्याची किनार आहे. राहुल यांनी त्यांची आई सोनिया गांधी यांच्या 'बिलॉंगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान आई-वडिलांच्या जुन्या आठवणी सांगितल्या होत्या.

यावेळी त्यांनी, "आमच्या घरी जेवणावेळी आई अनेकदा बाबांच्या मांडीवर बसलेली पाहायचो," असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानावरून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. अशातच रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी अशाच प्रकारचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जेनेलिया रितेश यांच्या मांडीवर बसल्याचं दिसत आहे. हा फोटो रितेश यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांचा हा फोटो आपल्या स्टोरीवर शेअर करत, त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना जणू अप्रत्यक्षपणे पती-पत्नीमधील प्रेम नेमकं कसं असतं, हे दाखवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, रितेश यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मंगळवारी हा फोटो शेअर केला होता. ‘दोघांसाठी टेबल, एकासाठी खुर्ची’, असं कॅप्शन त्यांनी या फोटोखाली दिलं आहे.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?

राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्या 'बिलॉंगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान आई-वडिलांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, "आमच्या घरी जेवणावेळी आई अनेकदा बाबांच्या मांडीवर बसलेली असे. मला वाटायचे की, हे सामान्य असेल. इतरांच्या घरातही असेच होत असेल. मी मित्रांच्या घरी गेलो, तेव्हा मला फरक लक्षात आला. मी माझ्या मित्रांना विचारले की, तुझी आई तुझ्या वडिलांच्या मांडीवर का बसत नाही?" अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी या कार्यक्रमात केली होती. त्यामुळे आता शेअर केलेल्या स्टोरीमुळे त्यांच्या या जुन्या वक्तव्याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT