Shivsena News : ठाकरेंच्या सेनेला आणखी एक खिंडार? थेट शिंदेंच्या मंत्र्यासोबत आमदाराचा 'तो' फोटो व्हायरल; राजकारणात मोठी खळबळ!

Political News : ठाकरे सेनेचे आणखी काही आमदार शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली असतानाच आता आणखी एक आमदार एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यासोबत दिला आहे. त्याचा फोटोही व्हायरल झाला असल्याने लवकरच धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Eknath Shinde,  Uddhav Thackeray
Eknath Shinde, Uddhav Thackeray sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात गेल्या दोन दिवसापासून वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या आठवड्यात ठाकरे सेनेचे सहा खासदार फुटले असल्याची घटना ताजी असताना राज्यातील फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघार उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या होत्या. त्यातच मंगळवारी एकनाथ शिंदेंनी मोठा धक्का दिला असून उपसभापतिपदाची उमेदवारी आदित्य ठाकरेंचे विश्वासू आमदार सचिन अहिरला देत बिनविरोध निवडून आणले आहे. त्यातच आता ठाकरे सेनेचे आणखी काही आमदार शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली असतानाच आता आणखी एक आमदार एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यासोबत दिला आहे. त्याचा फोटोही व्हायरल झाला असल्याने लवकरच धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या सेनेला धक्का बसण्याचे सत्र सुरूच आहे. आगामी काळात उद्धव ठाकरेंचे आणखी काही आमदार हे शिंदे गटात जाण्याची दाट शक्यता असल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी ऑपरेशन टायगर सुरु झाल्याचेही शिंदे गटातील नेते सांगत आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता आणखी एक आमदार अचानक चर्चेत आला आहे. या आमदाराने एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते तथा मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यासोबचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील हा आमदार शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे.

Eknath Shinde,  Uddhav Thackeray
Balasaheb Thackeray controversy : बाळासाहेबांच्या वक्तव्याची शिंदेंसमोर खिल्ली; ठाकरेंच्या शिलेदाराच्या संतापाचा स्फोट, म्हणाला, ‘हे तर अमित शाहांचे सैनिक..!’

गेल्या आठवडाभरापासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील आमदारांची विधानभवानाच्या परिसरात भेट होत राहते. सध्या मात्र पक्षांतराचे वारे वाहू लागले असतंच आता व्हायरल झालेला फोटो सध्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबतच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Eknath Shinde,  Uddhav Thackeray
Rajabhau Waje : सिन्नर तालुक्याला ठाकरेंनी काय दिलं... दिघोळे साहेब, माणिकराव कोकाटेचं नाव घेत राजाभाऊंनी काय सांगितलं?

या फोटोमध्ये आमदार प्रवीण स्वामी सोबतच मंत्री प्रताप सरनाईक दिसत आहेत. विधानभवन परिसरातील हा फोटो आहे. हा फोटो पोस्ट करताना त्यांनी कोणतेही कॅप्शन दिलेले नाही. परंतु त्यांच्या या फोटोची सगळीकडेच चर्चा होत आहे.

Eknath Shinde,  Uddhav Thackeray
Aditya Thackeray: खासदारांच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे आक्रमक! विधानसभेत थेट एकनाथ शिंदेंना भिडले

काही लोकांनी ‘हे पण शिंदे गटात गेले का?’ अशा आशयाची मिश्कील टिप्पणी केली आहे. दरम्यान, प्रवीण स्वामी यांनी प्रताप सरनाईक यांच्यासोबतचा फोटो अपलोड केलेला असला तरी त्यातून कोणत्याही राजकीय निर्णयाची शक्यता सध्या तरी वाटत नाही.

Eknath Shinde,  Uddhav Thackeray
MNS Politic's : कल्याण डोंबिवलीमधील निर्णयाबाबत ठाकरेंच्या शिलेदाराने मनसेला सुनावले; ‘किमान आमच्याशी चर्चा करायला हवी होती’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com