Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi : दिल्लीतील घटनेवर राहुल गांधी संतापले; सरकारच्या बेफिकिरीला फटकारले

Rahul Gandhi slammed the government over the incident in Delhi : दिल्लीतील तळघरात पावसाचे पाणी घुसून त्यात अडकून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अशा घटनांना सरकारचा बेजबाबदारपणा असल्याचे म्हणत संताप व्यक्त केला.

Pradeep Pendhare

Rahul Gandi News : दिल्लीतील मुसळधार पावसामुळे IASच्या अभ्यास करणाऱ्या तीन युवकांचा तळघरातील पाण्यात अडकल्याने मृत्यू झाला. या घटनेवर संताप व्यक्त केला जात असताना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत सरकारविरोधात निदर्शनं केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची देखील यावर प्रतिक्रिया देत सरकारच्या बेजबाबदारपणा फटकारले.

दिल्लीतील जुने राजेंद्रनगरमधील राऊस IASच्या स्टडी सर्कलच्या तळघरात पाणी साचून त्यात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या तळघरातून 14 विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर मात्र दिल्लीतील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात निदर्शनं करत आहेत. काँग्रेस (Congress) नेता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेवर सरकारचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना या घटनेबाबत त्यांच्या 'एक्स' खात्यावर पोस्ट केली आहे. "तीन विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यूची घटना खूपच दुर्दैवी आहे. काही दिवसापूर्वी देखील पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. दिल्लीतील घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहे. मुलभूत सुविधांमधील अभाव आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे. असुरक्षितेचे वातावरण, नगर रचना विभागाचे प्लनिंग आणि सरकारच्या गैरजबाबदार कारभारामुळे सर्वसामान्यांना आपला जीव गमवावा लागल आहे. सुरक्षित आणि सुविधांयुक्त जीवन देशातील प्रत्येक नागरिकांचा अधिकार आहे", असे राहुल गांधी यांनी सांगितले.

दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचा आदेश दिला आहे. मुख्य सचिव नरेश कुमार यांना चौकशीचा अहवाल 24 तासात देण्याचा आदेश केला. या घटनेबाबत दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन्सिक पथकाकडून छाननी सुरू आहे. फॉरेन्सिक पथक काही पुरावे गोळा करत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि लवकरच सत्य बाहेर येईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. या घटनेत दिल्ली पोलिसांनी IASच्या स्टडी सर्कल 2 जणांना ताब्यात घेतले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी IASच्या स्टडी सर्कलला बाहेर पडण्यासाठी एकच गेट आणि तळघरात जाण्यासाठी एकच रस्ता आहे. तसेच ही सर्व घटना संपूर्ण निष्काळजीतून घडल्याचा आरोप देखील केला.

आप आणि भाजपमध्ये जुंपली

या घटनेवरून आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये राजकीय वाॅर सुरू झाला आहे. आपचे आमदार दुर्गेश पाठक यांनी आजूबाजूचे नाले किंवा गटार फुटल्याने पाणी तुंबले. या भागात भाजपचा 15 वर्षांपासून नगरसेवक आहे. त्यामुळे या घटनेवर भाजपने उत्तर द्यावे की, त्यांनी काय केले? यावर भाजपचे पलटवार केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी अरंविद केजरीवाल, आतिशी आणि त्यांच्या सरकारच्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. दिल्ली महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. नाल्याची सफाई का झाली नाही? या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT