Yogi Adityanath : ‘योगीजी को ठोक दो’; दिल्लीतील भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर काँग्रेसची टोलेबाजी

Conflict in BJP Uttar Pradesh and Delhi over Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हटवण्यासाठी दिल्लीतून भाजप नेते प्रयत्नशील असून, यावर काँग्रेसचे रणदीपसिंग सुरजेवाला यांनी राजकीय टोलेबाजी केली.
Yogi Adityanath
Yogi Adityanath ModiSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh Politics : उत्तर प्रदेश भाजपमधील अंतर्गत राजकीय कलहावर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी जोरदार टोलेबाजी केली.

"उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री यांना दिल्लीला बोलवले गेले. त्यांना इशारा केलाय की, 'योगीजी को ठोक दो'. पण मला माहिती नाही की, हा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह की, जे. पी. नड्डा यांचा आहे? ते त्यांचे घर आहे. त्यांच्या घरात काय चालले आहे, त्यांनाच माहीत", असे रणदीपसिंग सुरजेवाला यांनी सांगून भाजप उत्तर प्रदेशमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आणला आहे.

काँग्रेसच्या रणदीपसिंग यांनी भाजप (BJP) उत्तर प्रदेशाच्या अंतर्गत कलहावर जोरदार शेरेबाजी केली. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा जोरदार पराभव झाला. त्यामुळे उत्तर प्रदेशचे नेते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नेते टार्गेट करू लागले आहे. मुख्यमंत्री योगींपेक्षा त्यांच्याबरोबर काम करणारे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांना दिल्लीतून जवळ केले जाऊ लागले आहे. त्यामुळे भाजप उत्तर प्रदेशमधील कलहावर काँग्रेस आपले मांडे भाजून घेताना दिसत आहे.

Yogi Adityanath
Yogi Adityanath : दोन उपमुख्यमंत्र्यांचे थेट मुख्यमंत्र्यांना खुलं चॅलेंज; भाजपची डोकेदुखी वाढली...

रणदीपसिंग यांनी योगीजी को ठोक दो, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्यापैकी कोणाचा इशारा होता, हे गुलदस्त्यात ठेवले आहे. "भाजप उत्तर प्रदेशमध्ये आपपासात बुलडोझर वॉर सुरू झाला आहे. एकमेकांवर बुलडोझर चढवले जात आहेत. बुलडोझर चढवा, हे आमचे काम नाही. तो त्यांचा पक्ष आहे. परंतु या वादात उत्तर प्रदेशमधील विकासावर दिल्लीतील सरकार बुलडोझर चढवत आहे. याशिवाय उत्तर प्रदेशमधील भाजप सरकार बिनकामाची होऊन बसली आहे. यातून उत्तर प्रदेशमधील लोकांच्या हितांवर आणि विकासावर बुलडोझर चढवत आहे. हे कधीच स्वीकारण्यासारखे नाही", असे रणदीपसिंग यांनी सांगितले.

भाजपच्या अंतर्गत कलहामुळे उत्तर प्रदेशमधील विकासकामे ठप्प झाली असून, यात जनते विनाकारण भरडली जात आहे. महाविकास आघाडीची लोकांना आता आठवण होऊ लागली आहे, असेही रणदीपसिंग यांनी सांगून जनतेच्या सेवेसाठी आम्ही तयार आहोत, असा विश्वास दिला.

Yogi Adityanath
Rajya Sabha : लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण; शाहू महाराजांचा उल्लेख अन् राज्यसभेत विधेयक, प्रचंड गदारोळ

केजरीवाल यांचे भाकीत

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधून भाजपला जोराचा झटका बसला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हटवण्यासाठी भाजपचे दिल्लीतून प्लॅनिंग सुरू आहे. ते लवकरच समोर येईल, असा दावा आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशमधील भाजप नेत्यांमध्ये अंतर्गत सुरू असलेल्या राजकीय संघर्षावर भाष्य केले होते. लोकसभा निवडणुकीनंतर योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्रीपदावरून हटवले जाईल, असा दावा केजरीवाल यांनी केला होता. भाजपच्या दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील नेत्यांमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरून तरी सध्याचे चित्र असेच दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com