Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi News: उन्हामुळे त्रासलेल्या राहुल गांधींनी भर सभेत डोक्यावर ओतलं थंड पाणी

Jagdish Patil

Rahul Gandhi Viral Video in UP: एकीकडे देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याच पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे देशभरात तापमानात देखील खूप वाढ झाली असून नागरिकांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. सामान्य नागरिकांप्रमाणे निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरणाऱ्या राजकीय नेत्यांनादेखील वाढत्या उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.

याच उन्हाच्या झळांपासून आपलं संरक्षण करण्यााठी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भरसभेत डोक्यावर पाण्याची बॉटल ओतून घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तर राहुल यांनी अचनाक डोक्यावर पाणी ओतल्यामुळे सभेला उपस्थित असणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रचारासाठी राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) दौऱ्यावर असताना त्यांनी डोक्यावर पाणी ओतून घेतलं. उत्तर प्रदेशातील रुद्रपूरमध्ये त्यांची आज एक सभा होती. सभेत बोलत असताना त्यांनी पाणी पिण्यासाठी हातात एक बॉटल घेतली. तेवढ्यात खाली बसलेले लोकांनी गर्मी गर्मी असं ओरडायला सुरुवात केली. लोकांकडे पाहून राहुल यांनी देखील, आज जास्तच गर्मी आहे, असं म्हणत थेट बॉटलमधील पाणी डोक्यावर ओतून घेतलं. राहुल (Rahul Gandhi) यांचे हे कृत्य पाहताच लोकांनी मोठ्यांने जल्लोष केल्याचंही व्हिडिओत दिसत आहे.

तर यानंतर राहुल यांनी सभेत बोलताना मोदी सरकारवर (Modi Govt) हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी अग्नीवीर योजना रद्द करण्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, मोदी सरकारच्या अग्नीवीर योजनेने (Agniveer Yojana) देशातील सैनिकांना मजदुरांमध्ये बदलण्याचं काम केलं आहे. या योजनेमुळे सीमेवर शहीद झालेल्या सैनिकांना पेन्शन किंवा शहिदांचा दर्जा मिळणार नाही. परंतु, इंडिया आघाडीचं सरकार येताच ही योजना आम्ही रद्द करू, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

तसंच यावेळी त्यांनी भाजप (BJP) संविधान बदलणार असल्याचं जाहीपणे सांगतं आहे. त्यामुळे ही लढाई विचारधारेची लढाई आहे. एकीकडे इंडिया आघाडी आहे, तर दुसरीकडे असे लोक आहेत, ज्यांना संविधान बदलायचं आहे. भाजपचे काही नेते जाहीरपणे संविधान बदलणार असल्याचं बोलतात. परंतु, आम्ही असं कधीही होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT