Porsche Crash Case: पुणे 'कार'नामा; फडणवीसांची भूमिका संशयास्पद, पटोलेंचा गंभीर आरोप

Nana Patole Attacked on Devendra Fadnavis:सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप सर्व क्षेत्रात वाढला असून गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. गुन्हेगारांची अशी हिम्मत होतेच कशी, राजकीय आशिर्वाद असल्याशिवाय असे होऊ शकत नाही. राज्याला बदनाम करण्याचे पाप भाजपाने केले आहे.
Nana Patole Attacked on Devendra Fadnavis
Nana Patole Attacked on Devendra FadnavisSarkarnama

Mumbai News: कल्याणीनगर येथील अपघात (Porsche Crash Case) प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पुणे पोलिस आयुक्तालयात येऊन तपासाची सूत्रे फिरवली. या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत असताना काँग्रेसचे नेते,प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केला आहे. पुणे अपघात प्रकरणात फडणवीसांची भूमिका संशयास्पद वाटते, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी पटोलेंनी केली आहे.

पुणे अपघात प्रकरणात गर्भश्रीमंत व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याचे दिसत असल्याने राज्याच्या यंत्रणेवर विश्वास नाही, या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फतच झाली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

Nana Patole Attacked on Devendra Fadnavis
MLA Raju Patil: मनसे आमदाराचा पारा चढला; महापालिका अधिकाऱ्यांना दिला सज्जड दम, 'याद राखा...'

पटोलेम्हणाले, "नागपूर, जळगाव व पुण्यात अशा घटना घडल्या. पण अत्यंत संताप आणण्याचा प्रकार म्हणजे यातील गर्भश्रीमंत आरोपींना तातडीने जामीन कसा मिळेल, यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न झाले.दुष्काळाचा प्रश्न गंभीर असताना दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे सेवन करुन सर्वसामान्य लोकांना गाडीखाली चिरडण्याचे प्रकार वाढले आहेत,"

या अपघात प्रकरणी फडणवीस यांनी स्वतःच्या वकीलीचा वापर आरोपींना वाचवण्यासाठी केला. पुण्यात ड्रग्जचा अवैध धंदा जोरात सुरु आहे. पुणे व नागपूर शहरातही अवैध पबने थैमान घातले आहे. या प्रकरणानंतर पुण्यातील ३६ अवैध पब पाडावे लागले. गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरूण पिढीला बरबाद करण्याचे पाप भाजपाने केले आहे, असा आरोप पटोलेंनी केला आहे.

सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप सर्व क्षेत्रात वाढला असून गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. गुन्हेगारांची अशी हिम्मत होतेच कशी, राजकीय आशिर्वाद असल्याशिवाय असे होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांच्या राज्याला बदनाम करण्याचे पाप भाजपाने केले आहे, असेही पटोले म्हणाले. यावेळी राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार वजाहत मिर्झा, माजी खासदार हुसेन दलवाई, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com