Rahul Gandhi Target SEBI and PM Modi Sarakarnama
देश

Rahul Gandhi on Hindenburg Report : 'हिंडनबर्ग' रिपोर्टवरून राहुल गांधींचा 'SEBI'वर निशाणा अन् पंतप्रधान मोदींनाही लगावला टोला!

Mayur Ratnaparkhe

Hindenburg Report and Congress : हिंडनबर्गच्या रिसर्चच्या नव्या रिपोर्टनंतर आता भारतामधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलच तापलं आहे. या रिपोर्टवरून सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

काँग्रेसने याप्रकरणावरून सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच 'SEBI'ला लक्ष्य करत संयुक्त संसदीय समितीकडून चौकशीची मागणी केली आहे. तर भाजपने हे काँग्रेसचे षडयंत्र असल्याचे म्हटलं आहे. दरम्यान आता, काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनीही आक्रमक भूमिका घेतली असून, थेट पंतप्रधान मोदींवरच निशाणा साधला आहे.

राहुल गांधींनीही(Rahul Gandhi) याप्रकरणी 'SEBI' प्रमुक माधवी पुरी बुच यांना लक्ष्य करत म्हटले की, लहान किरकोळ गुंतवणूकदारांच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या 'SEBI'च्या प्रतिष्ठेला त्यांच्या अध्यक्षांवर झालेल्या अशाप्रकारच्या आरोपांमुळे धक्का बसला आहे.

याशिवाय राहुल गांधींनी म्हटले की, देशभरातील प्रामाणिक गुंतवणूकदारांचे सरकारसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत - 'SEBI'च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी आतापर्यंत राजीनामा का दिली नाही?, जर गुंतवणूकदारांना त्यांची कष्टाची कमाई गमावावी लागली तर त्याची संपूर्ण जबाबदारी कुणाची, पंतप्रधान मोदी(PM Modi), सेबी अध्यक्ष की गौतम अदाणी?, समोर आलेले नवीन आणि अत्यंत गंभीर आरोप बघता सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची पुन्हा स्वत:हून दखल घेत चौकशी करणार का?

तसेच, पंतप्रधान मोदींवर टीका करत राहुल गांधी हेही म्हणाले की आता हे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे की, पंतप्रधान मोदी संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीला एवढे का घाबरत आहेत आणि यामुळे काय उघड होवू शकतं.

याचबरोबर राहुल गांधी यांनी एख व्हिडीओ शेअर करत म्हटले की, कल्पना करा की भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक क्रिकेट सामना खेळला जात आहे आणि हा सामना बघणारा, खेळणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला हे माहीत आहे की अंपायर न्यायी नाही. अशावेळी त्या सामन्याचे काय होईल? सामन्याची निष्पक्षता आणि निकालाचे काय होईल? या सामन्यात भाग घेणाऱ्या व्यक्तिच्या रूपात तुम्हाला काय वाटेल? भारतीय शेअर बाजारात अगदी असंच सुरू आहे.

मागील काही वर्षांमध्ये लोक मोठ्यासंख्येने भारतीय शेअऱ बाजारात गुंतवणूक करत आहेत. ते आपल्या कष्टाची कमाई, प्रामाणिकपणे कमावलेली बचत शेअऱ बाजारात गुंतवत आहेत. अशावेळी लोकसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून माझे हे कर्तव्य आहे की, मी तुमच्या लक्षात ही गोष्ट आणून द्यावी की भारतीय शेअर बाजार जोखमीने वेढलेला आहे. कारण शेअर बाजार नियंत्रित करणाऱ्या संस्थेबरोबरच वाटाघाटी झाली आहे. असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT