Rahul Gandhi sarkarnama
देश

TMC symbol dispute : शिवसेना-राष्ट्रवादीनंतर TMC; राहुल गांधींनी सांगितला पक्षफोडीचा 'पॅटर्न'; भाजपसह निवडणूक आयोगावर केले गंभीर आरोप

Rahul Gandhi on TMC dispute : निवडणूक आयोगाच्या घटनात्मक जबाबदारीवरही राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला. आयोगाची जबाबदारी जनादेशाचे रक्षण करण्याची आहे. मात्र, जनतेचा कौलच बदलून टाकणाऱ्या शक्तींना आयोग मदत करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Jagdish Patil

Rahul Gandhi on TMC Row : तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावरून काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट करत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता तृणमूल काँग्रेसच्या प्रकरणात एकसारखा पॅटर्न दिसत असल्याचं म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी म्हटलं की, 'आधी शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता तृणमूल काँग्रेस. प्रत्येक वेळी भाजप आणि निवडणूक आयोग मिळून एखादा पक्ष फोडतात आणि त्यानंतर त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह काढून घेतले जाते.

‘संपूर्ण पक्षच चोरीला जाऊ शकतो, तर कोट्यवधी भारतीयांची मते चोरीला जाणेही आश्चर्यकारक नाही, मतांची चोरी, सरकारची चोरी आणि आता पक्षाची चोरी’ हे लोकशाहीच्या ऱ्हासाचे प्रतीक बनले आहे, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाच्या घटनात्मक जबाबदारीवरही राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला. आयोगाची जबाबदारी जनादेशाचे रक्षण करण्याची आहे. मात्र, जनतेचा कौलच बदलून टाकणाऱ्या शक्तींना आयोग मदत करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. ही लढाई केवळ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची नसून, स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांची अपेक्षा असलेल्या प्रत्येक राजकीय पक्षाची आणि मतदाराची असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

तृणमूलच्या नाव आणि चिन्हाचा वाद

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. पक्षातील बंडखोर आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला असून अरूप रॉय हे या गटाचे नेतृत्व करत आहेत. यानंतर तृणमूल काँग्रेसचे नाव आणि निवडणूक चिन्ह यावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला.

या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अंतरिम व्यवस्था लागू केली आहे. ममता बॅनर्जी आणि अरूप रॉय यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गटांना सध्या ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि पक्षाचे आरक्षित निवडणूक चिन्ह वापरण्यास मनाई केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT