Tipu Sultan Photo Controversy : टिपू सुलतान फोटो वाद थेट हायकोर्टात! राज्य सरकारला नोटीस, हिंदुत्ववादी संघटनांची कोंडी?

Malegaon Deputy Mayor Shan-e-Hind : मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या कार्यालयात टिपू सुलतान यांची प्रतिमा लावण्यात आली होती. त्याला हिंदुत्ववादी संघटनांनी अक्षय घेतल्याने वाद उफाळला होता. आता या वादावरून या संघटनांची चांगलीच कोंडी होण्याची चिन्हे आहेत.
Shaan-e-Hind Moves Bombay High Court,Tipu Sultan photo controversy, Malegaon
Shaan-e-Hind Moves Bombay High Court, Tipu Sultan photo controversy, MalegaonSarkarnama
Published on
Updated on

Tipu Sultan News: समाजवादी पक्षाच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांनी आपल्या शासकीय कार्यालयात टिपू सुलतान यांची प्रतिमा लावली होती. ही प्रतिमा नागरिकांनी त्यांना भेट दिली होती. प्रतिमा कार्यालयात लावल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या विरोधात रान पेटवले होते.

यासंदर्भात मालेगाव महापालिका प्रशासनाने ही प्रतिमा काढून टाकण्याचे आदेश दिले होते. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद रंगला होता. हिंदुत्ववादी संघटनांच्या भूमिकेला समाजवादी पक्षाने आक्षेप घेतला होता.

मालेगाव महापालिकेतील सत्ताधारी इस्लाम पक्ष, समाजवादी पक्षाने देखील आक्रमक भूमिका घेत विरोधकांना प्रत्युत्तर दिले होते. आता विरोधक आणि प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

या प्रश्नावर आता उच्च न्यायालयाने राज्य शासनाला नोटीस बजावली आहे. प्रशासनाने आपले उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका ही वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

Shaan-e-Hind Moves Bombay High Court,Tipu Sultan photo controversy, Malegaon
Shivsena : एकनाथ शिंदेंकडून भाजपच्या डोळ्यात खुपणारे डाव : CJP आंदोलनावर सायलेंट, पाठोपाठ 3 दिग्गज अभिजीत दिपकेंकडे

हिंदुत्ववादी संघटनांची कोंडी

महापौरांनी राज्यघटनेत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेचा समावेश करण्यात आल्याचा मुद्दा पुढे केला आहे. राज्यघटनेत विविध राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमांचा मूळ मसुद्यात समावेश आहे. त्यात प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून तर टिपू सुलतान यांचाही समावेश आहे. टिपू सुलतान यांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष केला होता. त्यामुळे या प्रश्नावर राज्य शासन काय भूमिका घेते याची उत्सुकता लागली आहे. उपमहापौरांनी या प्रश्नावर राज्य शासनाबरोबरच हिंदुत्ववादी संघटनांची कोंडी केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. यात न्यायालय काय भूमिका घेते याची उत्सुकता आहे.

Shaan-e-Hind Moves Bombay High Court,Tipu Sultan photo controversy, Malegaon
Malegaon Tipu Sultan Controversy : टिपू सुलतानचा फोटो दालनात लावण्याची परवानगी द्या, मालेगावच्या उपमहापौरांची न्यायालयात याचिका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com