Rahul Gandhi On Women Reservation  Sarkarnama
देश

Rahul Gandhi on BJP defeat in Ayodhya : राहुल गांधींनी सांगितलं अयोध्येतील भाजपच्या पराभवाचं कारण, म्हणाले...

Mayur Ratnaparkhe

Rahul Gandhi on Loksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपला मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा जागांच्या संख्येत चांगलाच फटका बसला आहे. शिवाय, यंदा भाजप 400 पार असा असा दावाही करत होती. मात्र भाजपला केवळ 240 जागांपर्यंतच मजल मारता आली.

मोठा झटका भाजपला अयोध्येत बसला आहे. फैजाबाद लोकसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद यांनी भाजपचे लल्लू सिंह यांना पराभूत केलं. आता यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपच्या पराभवाचं कारण सांगत, निशाणा साधला आहे.

एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) मागील दहा वर्षांत एका समुदायास दुसऱ्या समुदयाशी लढवण्याचे काम केले. निवडणूक काळात मोदी संविधान संपुष्टात आणण्याच्या गोष्टी करत होते. मात्र देशातील जनतेने त्यांना धडा शिकवला. मोदी केवळ अदाणी आणि अंबानीसाठी काम करतात, ते देशातील गरिबांसाठी काम करत नाहीत.

भाजपच्या पराभवाचं कारणही सांगितलं -

राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी म्हटले की, भाजप अयोध्येत पराभूत झाली, ते उत्तर प्रदेशातही हरले. ते यामुळे हरले कारण ते भारताच्या विचारधारेवर हल्ला करत होते. आपल्या संविधानात भारताला राज्यांचा संघ म्हटले गेले आहे. भारत राज्ये, भाषा, इतिहास, संस्कृती, धर्म आणि परंपरांचा एक संघ आहे. तुम्ही सर्वांनी फोटो पाहिला असेल की, नरेंद्र मोदींनी संविधान आपल्या मस्तकी लावून धरले होते. हे देशातील जनतेने करण्यास भाग पाडलं आहे. पंतप्रधान मोदींना जनतेने संदेश दिला की, तुम्ही संविधानशी छेडछाड करू शकत नाहीत.

याशिवाय राहुल गांधींनी म्हटले की, जेव्हा निवडणूक सुरू झाली होती. तेव्हा भाजपचे(BJP) समर्थन करणाऱ्या मीडियाने म्हटले की त्यांना 400 जागा मिळतील. पंतप्रधान स्वत:च 400 पार म्हत होते. त्यांचे वरिष्ठ नेतेही 400 पारचीच भाषा करत होते. एका महिन्यानंतर ते 300 पार म्हणून लागले. काही वेळानंतर 200 पार आणि सर्वांनीच मग निवडणुकीचा निकाल काय लागला ते बघितलं. ही कोणती सामान्य निवडणूक नव्हती.

I.N.D.I.A आघाडीच्या विरोधात पूर्ण मीडिया होता. CBI, ED आणि संपूर्ण प्रशासन आमच्याविरोधात होते. निवडणूक आयोगाने पंतप्रधानांना अनुकूल अशी निवडणुकीची रुपरेषा तयार केली होती. अनेक प्रयत्नानंतर मोदी वाराणसीत पराभूत होता होता थोडक्यात वाचले. भाजप अयोध्येतही हारली, ते उत्तर प्रदेशातही हरले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT