rahul gandhi sarkarnama
देश

पाचही राज्यातील पराभवानंतर राहुल गांधींचे भावुक टि्वट

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी प्रचारसभेत जास्त झळकले नाही.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाचही राज्यात पराभवाला सामोरे जावे लागले. यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भावुक टि्वट करीत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी जनतेचे आभार मानले असून, पराभवाला स्वीकार केला आहे.

राहुल गांधी (rahul gandhi)निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे देखील आभार मानले आहेत. ''या पराभवातून आपल्याला एक शिकवण मिळाली असून, देशातील जनतेसाठी आपण काम करत राहू, '' अशा भावना राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये व्यक्त केल्या आहेत.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपुर येथील प्रचार करण्यात आला. तर उत्तरप्रदेशात प्रियंका गांधी यांनी यांनी नेतृत्व केले. प्रियंका यांनी उत्तरप्रदेशात २०९ सभा घेतल्या. अनेक रोड शो, डिजिटल कार्यक्रमांच्या माध्यमातून संवाद साधला. राहुल गांधी यांनीही अनेक सभा घेतल्या.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी प्रचारसभेत जास्त झळकले नाही. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी याच संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये प्रचारासाठी हजर होत्या, असे असतानाही काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. प्रियंका गांधी यांची जादूही या विधानसभा निवडणुकीत चालली नाही.

भाऊ-बहीण यांना मोठा झटका

२०१९ मधील कॅाग्रेसच्या पराभवाला राहुल गांधी यांचा जबाबदार धरण्यात आले होते. पक्षातून त्यांच्यावर अनेक वरिष्ठ नेत्यांनी टीका केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते पक्षाचा प्रमुख चेहरा आणि निवडणुक प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली होती.

२०१९ मध्या प्रियंका या राजकारणात सक्रीय झाल्या. गेल्या निवडणुकीत त्यांच्या सभांना गर्दी होत होती. पण यंदाच्या निवडणुकीत त्यांची जादू चालली नाही. त्यामुळे भाऊ-बहीण यांच्या राजकीय जीवनाला हा मोठा झटका असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT