Rahul Gandhi viral video Sarkarnama
देश

Rahul Gandhi viral video : राहुल गांधींचा विमानातील व्हिडिओ व्हायरल; भाजपने थेट सत्ता परिवर्तनाशी जोडले कनेक्शन

Rahul Gandhi flight video, Maharashtra BJP Rahul Gandhi criticism : भाजपच्या टीकेला काँग्रेस नेत्यांकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी म्हटले आहे की, इतर लोक परदेशात जात नाहीत का?

Rajanand More

Rahul Gandhi foreign visit : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा विमानातील एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हिएतनाम या देशात जाणाऱ्या विमानातील असल्याचा दावा केला जात आहे. भाजपच्या अनेक सोशल मीडियात हँडल्सवर हा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींवर निशाणा साधण्यात आला आहे. त्याला काँग्रेसनही प्रत्युत्तर दिले आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मागील आठवड्यात इंडिया आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात रान उठविले होते. सातत्याने आंदोलन करत देशाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आघाडीकडून दिल्लीत हे आंदोलन थांबविले आहे. त्यातच राहुल गांधींचा विमानातील व्हिडिओ समोर येताच भाजपने संधी साधली आहे.

महाराष्ट्र भाजपने हा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, राहुल गांधींचे अराजकतेचे ट्रेनिंग अर्धवट राहिले होते वाटते? राहुल गांधी पुन्हा गुप्त बैठकांसाठी परदेशात रवाना झाले आहेत. कदाचित 'Regime change' चा एक डाव फसला म्हणून त्यांच्या विदेशी मालकांनी पुन्हा नव्याने ट्रेनिंगसाठी बोलावले असावे, असा टोला लगाविण्यात आला आहे.

देशातील जनतेला आता चांगलेच कळून चुकले आहे कि काँग्रेस देशभरात कशी अराजकता पसरवत आहे. देशाला बांगलादेश बनवण्याचे मनसुबे बोलून दाखवले जात आहेत, मात्र ते या देशविरोधी कृत्यात कधीही यशस्वी होणार नाहीत, अशी टीकाही महाराष्ट्र भाजपने केली आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनीही राहुल गांधींवर शरसंधान साधले आहे.

भाजपच्या या टीकेला काँग्रेस नेत्यांकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी म्हटले आहे की, इतर लोक परदेशात जात नाहीत का? राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत. ते येल विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, लंडनमध्ये विद्यार्थ्यांना भेटतात, विद्वानांशी चर्चा करतात. ते पत्रकारांना मुलाखतीही देतात. जे काम पंतप्रधान करत नाहीत, ते राहुल गांधी करत आहेत. आपली एक परंपरा आहे. लोकसभेचे अधिवेशन सुरू असताना पंतप्रधान परदेशात जात नाहीत. पण आपले पंतप्रधान ही परंपरा तोडतात. तेव्हा कुणी प्रश्न उपस्थित करत नाही?, असा सवालही दीक्षित यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT