

Abhijeet Dipke video : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मंगळवारी सोशल मीडियात एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना पुढील काही दिवस उत्सवाच्या काळात कुटुंबासोबतच राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सध्या तुरुंगात असलेले सहकारी सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या हिंमतीला सलाम करत दिपके यांनी सर्व कार्यकर्त्यांना घाबरण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
अभिजीत दिपके यांनी सीजेपीच्या कार्यकर्त्यांना व्हिडिओ माध्यमातून संदेश दिला आहे. तुम्ही खूप सोसले आहे. संपूर्ण यंत्रणा तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्यासारखे निश्वार्थी लोक माझ्यासोबत असल्याने मी नशीबवान आहे. मागील काही दिवस आपल्यासाठी सोपे नव्हते. पहिल्या आंदोलनापासून मी सांगतोय की, पुढे जाऊन काही गोष्टी अवघड होत जातील. आपल्याला सोपे नसेल. आपल्या मागे पोलीस लावले जातील, अडकविले जातील. आता तसेच होत आहे. पण एवढे होऊनही तुम्ही सगळे एकजुटीने लढत होता, असे दिपके म्हणाले आहेत.
सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासाठी जसे सध्या अवघड जात आहे, तसेच तुम्हालाही त्रास झाला आहे. आपल्या कुटुंबासाठीही हे कठीण हात आहे. त्यांच्यावरही परिणाम होतो. त्यामुळे आता उत्सवाच्या काळात तुम्ही सगळे आपल्या कुटुंबासोबत राहावे, असे आवाहन दिपकेंनी कार्यकर्त्यांना केले. आपण द्वेषाविरोधात लढत आहोत. पण तो द्वेष आपल्यात येऊ नये, याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे, असेही ते म्हणाले.
खरे लीडर कोण?
सौरव दास कधी टिकणार नाही, असे म्हणत लोक त्याची खिल्ली उडवत होते. आज तोच सहा दिवसांपासून तुरुंगात आहे. हसत कोर्टात येतोय. आशुतोषही तसाच आहे. खरंतर ही चळवळ या दोघांनीच पुढे नेली आहे. मी तर फक्त त्यांच्या ऑर्डर फॉलो करत होतो. बाहेर वाटत असेल की मी लीडर होतो, पण खरे लीडर सौरव आणि आशु होते. तुला उद्या हे करायचंय, इथे जायचंय, असे ते मला सांगायचे. मी गुपचुपपणे करायचो, असे दिपकेंनी सांगितले.
माझ्यापेक्षा चांगली निर्णयक्षमता या दोघांमध्ये असल्याचेही दिपके यांनी सांगितले. सौरव आणि आशुच्या कुटुंबाशी मी बोललो आहे. त्यांची चिंता करू नका. ते कमजोर नाहीत. या दोघांच्या कुटुंबाकडूनच मला ताकद मिळतेय, प्रेरणा मिळतेय. हे दोघे तुरुंगात गेलेत म्हणून आपल्याला घाबरण्याची गरज नाही, असेही दिपकेंनी स्पष्ट केले.
अहिंसा अन् शांततेचा मार्ग
फ्रान्स आणि अन्य देशांत होत असलेल्या हिंसाचारावरून टीका होत असल्याबाबतही दिपकेंनी भाष्य केले. सौरव आणि आशु जेलमधून बाहेर आल्यानंतर महात्मा गांधींच्या अहिंसा आणि शांततेच्या मार्गाने चालतील. त्यांच्यामध्ये द्वेष नाही. हा द्वेष तुमच्या (सीजेपीला विरोध करणारे) मनात असून त्यातून तुम्ही देशाचे काय हाल केलेत, हे सर्वजण पाहत आहेत. आपल्यातील प्रेम कमी होऊ द्यायचे नाही. द्वेष पसरवू द्यायचा नाही, असे संदेश दिपकेंनी कार्यकर्त्यांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.