Rahul Gandhi and Shahrukh Khan  Sarkarnama
देश

आर्यनला अटक होताच राहुल गांधींनी शाहरूख खानला पाठवलेलं पत्र आलं समोर

आर्यन खानला अटक झाल्यानंतर मोठा गदारोळ उडाला होता. अनेक जणांनी अभिनेता शाहरुखन खानला पाठिंबा दिला होता तर काहींनी त्याला लक्ष्य केले होते.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs case) प्रकरणी आर्यन खानला (Aryan Khan) अटक झाल्यानंतर मोठा गदारोळ उडाला होता. अनेक जणांनी आर्यनचा पिता अभिनेता शाहरुखन खानला (Sharukh Khan) पाठिंबा दिला होता तर काहींनी त्याला लक्ष्य केले होते. आर्यनला अटक झाल्यानंतर काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही शाहरुखला पत्र पाठवले होते. आता ते पत्रच समोर आले आहे.

अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (NCB) आर्यनला 3 ऑक्टोबरला पकडले होते. तो 8 ऑक्टोबरपासून आर्थर रोड कारागृहात होता. आर्यनसह तिघांच्या जामिनावर तीन दिवस उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. आर्यनच्या वतीने माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. रोहतगी हे आर्यनची बाजू मांडणार असल्याचे सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर तीन दिवसांच्या सुनावणीनंतर आर्यनसह तिघांना जामीन मिळाला आहे. अखेर 30 ऑक्टोबरला आर्यनची कारागृहातून सुटका झाली होती. मुनमुन आणि अरबाझ यांची 31 ऑक्टोबरला कारागृहातून सुटका झाली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनला अटक झाल्यानंतर अनेक जणांनी शाहरुख खानला दिलासा दिला होता. याचबरोबर त्याच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली होती. राहुल गांधी यांनीही यासंदर्भात पत्र पाठवले होते. आर्यनला अटक झाल्यानंतर सहाव्या दिवशी 14 ऑक्टोबरला राहुल गांधींचे पत्र शाहरूखला मिळाले होते. त्यावेळी आर्यनला न्यायालयाने जामीन नामंजूर केला होता. या पत्रात राहुल गांधींनी संपूर्ण देश तुझ्यासोबत, असे शाहरुखला म्हटले होते.

उच्च न्यायालयात सलग तीन दिवस आर्यनसह तिघांच्या जामिनावर सुनावणी सुरू होती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांनी आर्यन, मुनमुन आणि अरबाझ या तिघांना 28 ऑक्टोबरला जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाचा जामिनाचा आदेश मिळाल्यानंतर तिघांची कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा होणार होता. आर्यन आणि अरबाझ हे आर्थर रोड कारागृहात तर मुनमुन भायखळा महिला कारागृहात होता. न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर दोन दिवसांनी आर्यनची तर मुनमुन आणि अरबाझची 3 दिवसांनी सुटका झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT