Rahul Gandhi on Karnataka Govt: Sarkarnama
देश

Rahul Gandhi News: कर्नाटक सरकारचा शपथविधी पार पडताच राहुल गांधींची मोठी घोषणा; पुढच्या दोन तासात...

सरकारनामा ब्यूरो

Karnataka News: कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले. त्यानंतर आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या तर उपमुख्यमंत्रीपदाची डी.के. शिवकुमार यांच्यासह आठ आमदारांनी कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते.

यावेळी राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या जनतेला संबोधित करत जनतेचे आभार मानले. कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर राहुल गांधींनी मोठी घोषणा केली.

"पुढील दोन तासांत कर्नाटकच्या नव्या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक होईल. या बैठकीत आम्ही कर्नाटकच्या जनतेला जी पाच आश्वासन दिली होती, त्याबाबत कायदे बनतील. आम्ही जे बोलतो ते आम्ही करून दाखवतो", असं राहुल गांधी म्हणाले.

"कर्नाटकच्या जनतेला आम्ही खोटी आश्वासने दिली नाहीत. आम्ही जे बोलतो ते करतो. एक-दोन तासांत कर्नाटकच्या नव्या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक होईल. त्यामध्ये आम्ही आश्वासनं दिलेले पाच कायदे केले जातील. कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला ताकद दिली. हे आम्ही कधीही विसरणार नाहीत", असंही यावेळी राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेसने काय आश्वासन दिले होते?

- कर्नाटकच्या जनतेला 200 यूनिट फ्री वीज देण्याचं आश्वासन दिलं होतं.

- महिला प्रमुखांना 2000 रुपये दरमहा मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं.

- बीपीएल कुटुंबांना दरमहा 10 किलो धान्य देण्यात येईल, असं आश्वासन दिलं होतं.

- सर्व महिलांना कर्नाटकच्या बसमध्ये मोफत प्रवासाची सवलत देण्याचं आश्वासन दिलं होतं.

- बेरोजगार तरुणांना 3000 रुपये प्रतिमहिना आणि बेरोजगार डिप्लोमा धारकांना 1500 रुपये दरमहा देण्याचं आश्वासन दिलं होतं.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT