Rahul Gandhi Knee Problem Sarkarnama
देश

Rahul Gandhi Knee Problem : 'भारत जोडो'त राहुल गांधीना गुडघ्याचा त्रास; केरळमध्ये उपचार सुरू

सरकारनामा ब्यूरो

kerala News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahu Gandhi) सध्या केरळमधील एका आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये गुडघ्याच्या दुखापतीवर उपचार घेत आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांना गुडघ्याचा त्रास सुरू झाल्याची बातमी आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, "राहुल गांधींना रविवारपर्यंत डिस्चार्ज मिळू शकतो. गांधींना २१ जुलै रोजी कोट्टाक्कल आर्य वैद्य संस्थेत दाखल झाले होते. रविवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि आमदार एपी अनिल कुमार उपस्थित होते सध्या त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींना गुडघ्याचा त्रास झाल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. कन्याकुमारी ते काश्मीर असा राहुल गांधी यांनी प्रवास केला होता.

भारत जोडोची दुसरी यात्रा होण्याची शक्यता :

राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. यादरम्यान त्यांनी 12 राज्यांमधून 4000 किलोमीटर अंतर पायी चालले होते. 136 दिवसांत ते श्रीनगरला पोहोचले. आता भारत जोडोचा दुसऱ्या यात्रा होण्याची शक्यता आहे.

या प्रवासाचा दुसरा टप्पा ऑगस्टच्या शेवटच्या दिवसांत किंवा सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. यावेळी ते गुजरातमधील पोरबंदरहून पायी चालत यूपीमध्ये येणार आहेत. ही यात्रा उत्तर प्रदेशातील सुमारे 25 दिवसांत राज्यातील 15 जिल्ह्यांतून जाणार आहे. यात्रेचा मुक्कामही प्रयागराजमध्ये असण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT