Protest Against Manipur incident : `मोदी सरकार चुप्पी छोडो, भारत जोडो`, मणिपूर घटनेविरोधात संताप..

Marathwada : धाराशिवकरांनी तासभर मौन पाळून घटनेचा निषेध करत शहरातील हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले.
Protest Against Manipur incident
Protest Against Manipur incidentSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv : मणिपूर राज्यात एका महिलेची विवस्त्र करून धिंड काढण्याच्या घटनेने देशभरात संतापाचे वातावरण आहे. (Protest Against Manipur incident) त्यात पश्चिम बंगालमधील घटनेने मान शरमेने खाली गेली. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतांना देशाचे पंतप्रधान त्यावर बोलत नाहीत, अशी टीका होत आहे.

Protest Against Manipur incident
Dhnanjay Munde News : सुटीचा दिवस कारणी, कृषीमंत्री मुंडेंनी केली पिकांची पाहणी..

याच पार्श्वभूमीवर धाराशीवमध्ये (Osmanabad) विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, महिलांनी एकत्रित येत मणिपूरमधील घटनेच्याविरोधात `मौन सत्याग्रह`, करत निषेध नोंदवला. (Marathwada) ` मोदी सरकार चुप्पी छोडो, भारत जोडो`, असे फलक आणि तोंडावर काळी पट्टी बांधत महिला, मुली व वृद्धांनी देखील या आंदोलनात सहभाग नोंदवला.

मणिपूर अत्याचारप्रकरणी धाराशिवकरांनी तासभर मौन पाळून घटनेचा निषेध करत शहरातील हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. (Maharashtra) मानवतेला काळिमा फासणाऱ्या मणिूपरमधील कृत्याच्या विरोधातील संताप यावेळी व्यक्त करण्यात आला. मणिपूर राज्यात मागील तीन महिन्यांपासून हिंसाचार, दंगल, जाळपोळ, सैनिकांवर हल्ले आणि महिलांवर अत्याचार सुरूच आहेत. महिलांवर झालेला सामूहिक अत्याचार किळसवाणा आणि संतापजनक आहे.

या सगळ्या संतापजनक प्रकाराचा जाहीर निषेध करण्यासाठी धाराशिव शहरात मौन सत्याग्रह आंदोलन करण्यात आले होते. शहर आणि परिसरातील नागरिक बहुसंख्येने यात सहभागी झाले. आमदार कैलास पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, दत्ताभाऊ बंडगर,सगुणा आचार्य, सोमनाथ गुरव,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय निंबाळकर, डॉ. प्रतापसिंह पाटील,माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर संजय दुधगावकर.

तसेच युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर,अय्याज शेख,खलिफा कुरेशी,काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष डॉ. स्मिता शहापुरकर, प्रशांत पाटील, सय्यद खलील,काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिंदे,अनुराधा लोखंडे, रवि कोरे आळणीकर,नाना घाटगे, संकेत सूर्यवंशी, रवी वाघमारे,यांच्यासह विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com