Ramdas Athawale sarkarnama
देश

Ramdas Athawale News : राहुल गांधींचा खरा चेहरा समोर आला; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

Political News : फक्त राजकारण करायचं, भ्रष्टाचार करायचं ही काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे. आम्ही देशभरात रिपाइंच्या वतीने मोर्चे, निदर्शन करणार आहोत.

Sachin Waghmare

New Dehli News : कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन आरक्षण संपवू अस विधान केले आहे. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर व दलित समाजाचा अपमान केला आहे. दलित समाजात याचा राग असून आम्ही राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध करतो. राहुल गांधी यांनी आरक्षण संपवणार, असे म्हणत आदिवासी, दलित यांची मते घेतली. मात्र, त्यांचा खरा चेहरा आता समोर आला असल्याची टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.

दिल्लीत पत्रकाराशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेसच्या कारभारावर सडकून टीका केली. फक्त राजकारण करायचं, भ्रष्टाचार करायचं ही काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे. आम्ही देशभरात रिपाइंच्या वतीने मोर्चे, निदर्शन करणार आहोत, असेही रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली. (Ramdas Athawale News)

रामदास आठवले यांनी केली. राहुल गांधी यांना आदिवासी, दलित समाजाने जाब विचारला पाहिजे. काँग्रेस पक्ष हा तुमच्या आरक्षणाच्या विरोधातील पक्ष आहे. हे देशातील दलितांनी समजून घेतले पाहिजे. मोदींचं सरकार हे आरक्षणाचे रक्षण करणार सरकार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमचं सरकार आले तर हे जेलमध्ये गेले असते, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी विधान केले आहे, असे विधान करणे योग्य नाही. नाविलाज म्हणून काँग्रेसने खरगे यांना अध्यक्ष केले आहे. त्या खरगे यांनी असे विधान करणे योग्य नाही. राहुल गांधी यांची भूमिका चुकीची आहे, त्यांचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना बाहेर जावून असे बोलण्याची सवय असल्याचे ते म्हणाले.

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचा जामीन कोर्टाने मंजूर केला आहे. त्यांना हा जामीन दिला आहे ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी हरियाणा निवडणुकीत चांगला प्रचार करावा. हरियाणात भाजपचे सरकार येणार आहे, जम्मू काश्मीरमध्ये देखील भाजपचे सरकार येणार असल्याचा दावा आठवले यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT