Pune News, 13 Sept : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे 25 उमेदवार फिक्स झाल्याची माहिती आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) अंतर्गत बैठकीत या 25 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे या यादीत पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) हे बारामती विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर या 25 उमेदवारांना अजितदादांनी तयारीला लागण्याचे आदेश दिल्याचीही माहिती आहे.
महायुतीचे (Mahayuti) जागावाटप लवकरच पूर्ण होईल, त्याबाबतची चर्चा देखील सुरु आहे. मात्र, त्याआधी निवडणुकीसाठी उमेदवारांची तयारी असावी या दृष्टीने आतापासून कामला लागण्याच्या सूचना या उमेदवारांना दिल्या आहेत.
दरम्यान, अजित पवार बारामतीमधूनच (Baramati) लढणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. अजित पवारांव्यतिरिक्त उमेदवार बारामतीत नसणार त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचीही या बैठकीत चर्चा झाल्याचं सुत्रांनी सांगितलं.
त्यामुळे मागील काही दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) बारामतीमधून निवडणूक लढवणार की नाही? या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीच्या बैठकीत जाहीर केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे.
बारामती : अजित पवार
उदगीर : संजय बनसोडे
आंबेगाव : दिलीप वळसे-पाटील
दिंडोरी : नरहरि झिरवळ
येवला : छगन भुजबळ
पुसद : इंद्रनील नाइक
वाई खंडाळा महाबळेश्वर : मकरंद आबा पाटील
पिंपरी : अण्णा बनसोडे
परळी : धनंजय मुंडे
इंदापुर : दत्ता भरणे
रायगड : अदिति तटकरे
कळवण : नितिन पवार
मावळ : सुनील शेळके
अमळनेर : अनिल पाटिल
अहेरी : धर्मराव बाबा अत्राम
कागल : हसन मुश्रीफ
खेड : दिलीप मोहिते-पाटील
अहमदनगर : संग्राम जगताप
जुन्नर : अतुल बेनके
वडगाव शेरी : सुनील टिंगरे
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.