Rajasthan Politics  Sarkarnama
देश

Rajasthan Assembly elections 2024 : मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर न करता भाजप-काँग्रेस रिंगणात

who will be the face of the chief ministership : १९९८ पासून दर पाच वर्षांनी भाजप-काँग्रेसमध्ये सत्ता बदल होत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Rajasthan Politics : यंदा वर्षाअखेरीस राजस्थान विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रमुख लढत होणार आहे. दोन्ही पक्षानी त्यासाठी जोरदार तयारी केली आहे.

भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षामध्ये अंतगर्त वादामुळे विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार यावर एकमत होऊ न शकल्याने दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न करता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची औपचारिक घोषणा केली आहे.

वरिष्ठ नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन सुरु असलेल्या वादाकडे दुर्लक्ष करीत पक्षाचे नुकसान टाळण्यासाठी सध्या तरी दोन्ही पक्ष हे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न करता प्रचारात आमने-सामने येणार आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. त्यावेळी सचिन पायलट हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांना भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करण्यात आले होते.

निवडणुकीनंतर काँग्रेसने अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वीही २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून काँग्रेने अशोक गेहलोत यांचे नाव जाहीर केले होते तेव्हा वसुंधराराजे शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले होते.

वसुंधराराजे या मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार असल्याचे बोलले जाते. तर काँग्रेसमध्ये सचिन पायलट-अशोक गेहलोत वाद जगजाहीर आहे. १९९८ मध्ये गेहलोत हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर २००८ आणि २०१८ मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. १९९८ पासून दर पाच वर्षांनी भाजप-काँग्रेसमध्ये सत्ता बदल होत आहेत.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT