Mumbai News: ठाकरे सरकार कोसळल्यानंतर तर एकनाथ शिंदेंच्या फूटीनंतर आणि अजित पवारांच्या बंडानंतर तसेच महाराष्ट्रातील राजकीय उलापालथीनंतर उद्धव ठाकरे यांची पहिल्यांदाच स्फोटक मुलाखत शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत हे घेणार असून या मुलाखतीचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. या मुलाखतीचा टिझर शिवसेनेच्या (उद्धव बाळसाहेब ठाकरे) अधिकृत ट्विटरवरुन प्रसिद्ध करण्यात आला आहे.
गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. यामध्ये शिवसेनेने (ठाकरे गट) भाजपची साथ का सोडली?, एकनाथ शिंदेंनी बंड का केलं, शिंदेंना कोणी फितवले, आगामी काळात भाजपसोबतचा संघर्ष ठाकरे कसा ठेवणार?, ठाकरेंना महाविकास आघाडीतील मित्रांची साथ लाभणार का? पक्ष फूटीनंतर ठाकरेंची शिवसेना कशी वाढणार? राष्ट्रवादीच्या फुटीबाबत ठाकरे काय बोलणार?, अशा अनेक प्रश्नावर ठाकरे पहिल्यांदाच मुलाखतीच्या माध्यमातून आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
"महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा आवाज,’ आवाज कुणाचा’ वर! लवकरच…", असं कॅप्शन ठाकरेंच्या मुलाखतीच्या टिझरला देण्यात आलेले आहे. त्यामुळे या मुलाखतीतून ठाकरेंच्या 'मशाली'चा रोष नेमकं कुणाकडे असणार, हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
या मुलाखतीत ठाकरे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर, शिवसेना पक्ष आणि चिन्हांवर, ठाकरेंची आगामी रणनीती काय असणार?, या सगळ्या प्रश्नाच्या कोड्यातून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी उद्धव ठाकरे कोणत्या चाली रचणार, हे लवकरच त्यांच्या विशेष आणि स्फोटक मुलाखतीतून समोर येणार आहे. त्यामुळे ठाकरेंच्या या मुलाखतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.