Rajasthan Politics : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर मतदानाची प्रक्रिया नुकतीच पार पडली. आता निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र, आता निवडणुकीदरम्यान पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला का? अशा चर्चांना उधाण आले आहे. कारण राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून 692 कोटी रुपयांची अवैध रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच दारू आणि मतदारांना वाटण्यासाठी आणलेले इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे. यामुळे निवडणुकीत पैशाचा महापूर आला होता का? अशी चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)
राजस्थान राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण गुप्ता यांनी याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले, "राजस्थानमध्ये 690 कोटी रुपयांची रोकड, दारू, ड्रग्ज आणि मतदारांना वाटण्याच्या इतर काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व गोष्टींचा वापर मतदारांना आकर्षित करण्यासाठी केला जाणार होता. निवडणुकीत धनशक्तीचा गैरवापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने हे काम केले. मात्र, निवडणुकीदरम्यान आणखी पैशांचा वापर झाला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राजस्थानात 9 ऑक्टोबरपासून लागू झालेल्या आचारसंहितेच्या कालावधीत, निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलेल्या एफएस, एसएसटी आणि इतर अंमलबजावणीच्या यंत्रणांनी कठोर देखरेखीमुळे आणि सततच्या प्रयत्नांमुळे 692.36 कोटी रुपयांची अवैध रोकड, दारू आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
विशेष म्हणजे, राजस्थानात 2018 च्या मागील निवडणुकांपेक्षा ही आकडेवारी तब्बल 970 टक्क्यांनी जास्त असल्याचे निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे. रोख रक्कम, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आणि इतर मोफत वस्तू जप्त करण्याच्या कारवाईत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण गुप्ता म्हणाले की, 'सी-व्हिजिल अॅपचा वापर करून सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी नोंदवल्या. यापैकी बहुतांश प्रकरणे 100 मिनिटांच्या निश्चित केलेल्या वेळेत निकाली काढण्यात आले. शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या 20 हजार 298 तक्रारींपैकी 20 हजार 245 तक्रारींचे निराकरण करण्यात आले, तर 53 तक्रारींचे प्रक्रिया सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.