Eknath Shinde : 'खिलेगा कमल तो जितेगा राजस्थान!' भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे जयपूरला

Rajasthan Assembly Election : 'जय श्रीराम'चा जयघोष करून एकनाथ शिंदेंनी लोकांमध्ये जल्लोष निर्माण केला
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan Political News : छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या राज्यांतील निवडणुकीचे निकाल हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. यातूनच भाजपने अनेक नेते या निवडणुकीच्या प्रचारात उतरवले आहेत. भाजपच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानमधील जयपूर येथे गेले आहेत.

राजस्थानचे माजी मंत्री राजेंद्र गुढा यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. निवडणुकीनिमित्त गुरुवारी एकनाथ शिंदेंनी गुढा यांच्या मतदारसंघात मोठी रॅली काढली. या रॅलीतून त्यांनी संपूर्ण राजस्थानच्या नागरिकांना भाजपला मतदान करण्याचे आवाहनही केले.

Eknath Shinde
Mahayuti Politics : फडणवीसांच्या आदेशाला शिंदेंच्या मंत्र्यांचा विरोध; तुषार दोशींच्या बदलीवरून मोठी मागणी

शिंदे म्हणाले, "महाराष्ट्रात असलेल्या राजस्थानमधील लोकांच्या अडचणीत, सणावारांना मी स्वतः हजर असतो. आपले जुने नाते असल्यानेच मी जयपूरला आलो आहे. मतदानादिवशी म्हणजे २५ नोव्हेंबर रोजी आपल्या सर्व जवळच्या लोकांना सांगा, की राज्यात परिवर्तन घडवायचे आहे. राज्यातील भ्रष्टाचार संपवायचा आहे. त्यामुळे कमळ उमलले तरच राजस्थान जिंकणार आहे," असे आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde
Raju Shetti : स्वाभिमानी चळवळीची शिस्त बिघडली; आनंदोत्सवातच राजू शेट्टी पडले, नेमकं काय झालं ?

या वेळी लोकांनी मुख्यमंत्री शिंदेंचा जयघोष केला. तसेच मोदी-मोदी असे नारे लागावले, तर शिंदेंनी जय श्रीराम असा जयघोष करून उपस्थित लोकांमध्ये जल्लोष निर्माण केला. दुसरीकडे शिंदेंच्या राजस्थान दौऱ्यावर संजय राऊतांनी बोचरी टीका केली. त्यामुळे पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे गट आमने-सामने आला आहे.

संजय राऊत म्हणाले, "मुख्यमंत्री शिंदेंना प्रचार करू द्या, पुढच्या वर्षी अमेरिकेची निवडणूक आहे, त्यानंतर युरोपमधील सात राष्ट्रांमध्येही निवडणुका होणार आहेत. ते एवढे मजबूत नेते आहेत, त्यांना अमेरिकेत शिकागोमध्येही त्यांच्या सभा लावल्या जाणार आहेत. फ्रान्सची निवडणूक आहे, तिकडेदेखील त्यांना बोलावलं जाईल," असा खोचक टोला राऊतांनी लगावला.

(Edited by Sunil Dhumal)

Eknath Shinde
MP Sujay Vikhe : खासदार विखेंनी विरोधकांकडे मागितला गेल्या तीस वर्षांचा हिशोब; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com