Rajasthan Assembly Results 2023 Sarkarnama
देश

Rajasthan Assembly Results 2023 : राजस्थानात काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांना जनतेनं दाखवला घरचा रस्ता

Rajasthan Assembly News update: वसुंधरा राजे तब्बल 53193 मतांनी विजयी झाल्या आहेत.

Mangesh Mahale

Rajasthan Assembly News update: राजस्थान विधानसभेच्या निकालामध्ये काँग्रेसचा पराभव होत असल्याचे चित्र आहे. भाजपने बहुमताचा आकडा गाठला असून, काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. अनेक मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यात गोविंद राम मेघवाल, भंवर सिंह भाटी, प्रसादीलाल मीणा आदी मंत्र्यांना मतदारांनी नाकारले आहे.

खाजूवाला मतदार संघातून गोविंद राम मेघवाल, (कोलायत) भंवर सिंह भाटी, (सपोटरा) रमेश मीणा, (लालसोट) प्रसादीलाल‌ मीणा, (डीग-कुम्हेर) विश्वेन्द्र सिंह, (सिविल लाइंस) प्रताप सिंह खाचरियावास, (सिकराय) ममता भूपेश, (बानसूर) शकुंतला रावत, (कोटपुतली) राजेंद्र यादव, (कोलायत) भंवर सिंह भाटी, (बीकानेर पश्चिम) बीडी कल्ला, (अंता) प्रमोद जैन भाया आदी मंत्री पराभूत झाले आहेत.

राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर असतानाच माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या जयपूर येथे भाजप कार्यालयात पोहचल्या आहेत. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) या झालरापाटण विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. झालावाड जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपने तीन आणि काँग्रेसने एक जागा जिंकली आहे. वसुंधरा राजे तब्बल 53193 मतांनी विजयी झाल्या आहेत.

वसुंधरा राजे या 2003 पासून या जागेवरून विजयी होत आहेत. 2018 मध्ये त्यांनी तत्कालीन काँग्रेस नेते मानवेंद्र सिंह यांचा पराभव केला आणि 54 टक्के मतं मिळवली होती. राजस्थान निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) सध्या 110 ते 115 जागांवर आघाडीवर आहे.

सपोतरा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे हंसराज मीणा 43,834 मतांनी विजयी झाले. हंसराज मीणा यांना 1 लाख 11 हजार 385 मते मिळाली. काँग्रेसचे रमेशचंद मीणा यांना ६७ हजार ५५१ तर बसपचे विजयकुमार यांना ११ हजार ३०४ मते मिळाली. मनोहरठाणा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गोविंद राणीपूर तर खानपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सुरेश गुर्जर विजयी झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT