Telangana NEWS 2023 : घोडेबाजार रोखण्यासाठी अशी होती काँग्रेसची रणनीती ? डी के शिवकुमारांनी सोडला सुटकेचा निश्वास

Telangana Assembly Election : आमदारांना सुरक्षितस्थळी घेऊन जाण्यासाठी कोण होते सज्ज?
Telangana Election 2023 :
Telangana Election 2023 :Sarkarnama
Published on
Updated on

Telangana Assembly Elections Results in Marathi: देशातील चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर विविध वृत्तवाहिन्यांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये तेलंगणा राज्यात कॉंग्रेसला बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, परंतु तरीही घोडेबाजार होण्यासारखी परिस्थिती उद्भवलीच तर त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कॉंग्रेस पक्षाने केल्याची माहिती समोर येत आहे. निवडून आलेल्या सर्व आमदारांना सुरक्षितस्थळी नेण्याची जबाबदारी पक्षाने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवकुमार यांनी हे वृत्त फेटाळले आहे.

तेलंगणात कॉंग्रेसचा विजय दृष्टिपथात, तरीही खबरदारी

११९ सदस्य असलेल्या तेलंगणा विधानसभेत सत्ताधारी बीआरएस व कॉंग्रेस यांच्यात मुख्य लढत होती. भाजपनेसुद्धा विशेष तयारी केली होती. यामुळे सत्ताधारी बीआरएसला काठावर बहुमत मिळाले आणि सत्ता स्थापनेसाठी आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. केंद्रात असलेल्या भाजप सरकारचेसुद्धा पाठबळ मिळू शकते. असे झाले तर हाती आलेले यश निसटून जाण्याची शक्यता होती. निवडून आलेले कॉंग्रेस पक्षाचे आमदार फुटल्याचे प्रकार देशात यापूर्वी घडल्याने कॉंग्रेस नेतृत्वाने विशेष खबरदारी घेतली. विजयी आमदारांना बंगळुरू येथे नेण्याची जबाबदारी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर सोपवल्याची माहिती समोर येत आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी शिवकुमार हे हैदराबादमध्ये ठाण मांडून बसले होते. विशेष म्हणजे कर्नाटक राज्याचे विधानसभा अधिवेशन चालू असताना शिवकुमार हे हैदराबाद येथे आले आहेत. मात्र, राज्यात कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने पक्षाच्या नेतृत्वाने सुटकेचा श्वास सोडला आहे.

Telangana Election 2023 :
Rajasthan Assembly Results 2023 : चार राज्यांमधून पहिला निकाल आला; भारत आदिवासी पार्टीचे राजकुमार रोत विजयी

शिवकुमार यांनी यापूर्वी पार पाडली होती अशी जबाबदारी

कॉंग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल हे २०१७ मध्ये राज्यसभा निवडणूक लढवत असताना मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होणार असल्याचे संकेत मिळाले होते. गुजरातमधील त्या सर्व आमदारांना एका हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी डी.के. शिवकुमार यांनी पार पाडली होती. यासाठी शिवकुमार यांना मोठी किंमत चुकवावी लागली होती. आयकर विभागाने शिवकुमार यांच्या मालमत्तेवर छापेमारी केली होती. मात्र, तरीही शिवकुमार यांनी त्यास न जुमानता अहमद पटेल यांना विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. परिणामी अहमद पटेल यांचा विजय झाला, अन्यथा पटेल यांचा पराभव कॉंग्रेसच्या जिव्हारी लागला असता. ही जबाबदारी यशस्विपणे पार पाडल्यामुळे दिल्लीदरबारी डी. के. शिवकुमार यांचे वजन वाढले होते.

Edited by: Mangesh

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com