Ashok Gehlot Announce Free Electricity  Sarkarnama
देश

Ashok Gehlot Announce Free Electricity : 'मोफत वीज' ठरली सत्तेच्या सोपानाचं ‘जुगाड’ ; दिल्ली, पंजाबनंतर आता 'या' राज्यातही..

States giving Free Electricity : आता राजस्थानमध्येही ही घोषणा ऐकू येत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Rajasthan cm Ashok Gehlot Announce Free Electricity : दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोफत वीज दिल्यानंतर आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील कुठल्या राज्यांना मोफत वीज दिली जात असून त्याचा फायदा राजकीय पक्षांना किती झाला हे जाणून घेऊन या..

'मोफत वीज' ही घोषणा पहिल्यांदा आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत केली. सत्तेत येताच केजरीवाल यांनी दिलेले आश्वासन पाळले. 'मोफत घोषणा'ची (States giving Free Electricity) अंमलबजावणी केजरीवाल यांनी पूर्ण केली. त्यांनी दिलेले आश्वासने फक्त दिल्लीपर्यंत मर्यादीत न राहता त्याचे लोण अन्य राज्यांतही पसरत आहेत.

आम आदमी पक्षाने ज्या राज्यात निवडणूक लढवली त्या ठिकाणीही ही घोषणा करुन सत्तेच्या चाव्या आपल्या हातात घेतल्या. केजरीवालांचा निवडणुकीतील हा कित्ता अन्य पक्षांनी आणि राज्यांनीही गिरवला. आता राजस्थानमध्येही ही घोषणा ऐकू येत आहे.

दिल्लीमधून मोफत वीजेची सुरवात

दिल्लीत सत्तेत येण्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी सर्वात पहिले काँग्रेसच्या शीला दीक्षित सरकारच्या विरोधात मोर्चा उघडला, यात त्यांनी वाढत्या वीज बिलाचा मुद्या उचलून धरला. त्यांनी मतदारांना आश्वासन दिले की त्यांची सत्ता आली तर ते दोनशे युनिट मोफत वीज मिळेल. सत्तेत येताच आपने मतदारांना दिलेले आश्वासन पाळलं. याचा चांगला परिणाम झाला. दुसऱ्यांदा दिल्लीत आम आदमी पार्टीची सत्ता आली.

काँग्रेस आम आदमी पार्टीने गुजरात आणि हिमाचलसह अनेक राज्यांनी आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मोफत वीजेचा मुद्या घेतला. भाजपनेही या मुद्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत आपल्या जाहीरनाम्यात घेतला. पण येथे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

हिमाचल, पंजाब

हिमाचल मध्ये काँग्रेस सतेत येण्यापूर्वी भाजपच्या तत्कालीन जयराम ठाकुर सरकारने १२० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. याचा लाभ आताही जनतेला मिळत आहे. पण या ठिकाणी काँग्रेसने ३०० युनिट मोफत वीजेचा आश्वासन देत ते सत्ता मिळवली. पंजाबमध्ये मान सरकार येण्यापूर्वी आम आदमी पक्षाने मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. मान सरकार सत्तेत आल्यानंतर येथील जनतेला मोफत वीज मिळत आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली

कर्नाटक विधानसभेची निवडणूक नुकतीच झाली. येथे प्रचारात मोफत वीजेचा वादा काँग्रेसने केला होता. काँग्रेसने जी पाच आश्वासने मतदारांना दिली आहेत यात मोफत वीजेचाही उल्लेख आहे. सिद्धरामय्या यांनीही निवडणूक जिंकल्यानंतर हे आश्वासन पाळलं.

आता राजस्थानमध्ये घोषणा

आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारनेही मोफत वीजेची घोषणा केली आहे. १०० युनिट मोफत वीज देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. कोणीही किती युनिट वापरले तरी पहिले शंभर युनिट सगळ्यांसाठी मोफत असतील, असे गेहलोत यांनी सांगितले.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT