Rajasthan Election Result 2023  Sarkarnama
देश

Rajasthan Election Result 2023 : राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आघाडीवर; भाजपनं शतक गाठलं

Mangesh Mahale

Rajasthan Assembly Results 2023: लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या चार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. (Rajasthan Assembly Elections Results 2023) निकालापूर्वीच विजयाचा दावा सर्वच पक्षांनी केला आहे. राजस्थानमध्ये 100 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर काँग्रेस 70 जागांवर आघाडीवर आहे.

सरदारपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री अशोक गेहलोत आघाडीवर आहेत. दिया कुमारी याही आघाडीवर आहेत. अजमेर जिल्ह्यातील आठ विधानसभा जागांवर निकाल समोर येत आहेत. अजमेर उत्तरमधून अपक्ष आमदार ज्ञानचंद सारस्वत पोस्टल मतांमध्ये आघाडीवर आहेत. अजमेर दक्षिणमधून भाजपच्या उमेदवार अनिता भदेल या पोस्टल मतदानात आघाडीवर आहेत. केकडी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रघू शर्मा आघाडीवर आहेत.

राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदल होत असतो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जादूगार म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री अशोक गेहलोत जादू दाखवणार, की काहीशी विस्कळीत असणारी भाजप बाजी मारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. लोकसभेच्या 25 जागा या राज्यात आहेत. त्यादृष्टीने राजस्थानचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे.

भाजपने राजस्थानची सत्ता मिळवण्यासाठी जोर लावला आहे. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी उमेदवारांसाठी प्रचार केला. मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, भाजपच्या वसुंधरा राजे शिंदे, राज्यवर्धन सिंह राठोड, गोविंद सिंग दोतसारा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

निकालापूर्वी आलेल्या एक्झिट पोलमुळे राजस्थानमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा आहे, पण या वेळी एक्झिट पोलनी काही वेगळेच संकेत दिले आहेत.

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोलमध्ये चुरशीची लढत असली तरी काँग्रेसने आघाडी घेतली आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेसला 86 ते 106 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपला 80 ते 100 जागा मिळू शकतात. एक्झिट पोलमुळे काँग्रेसची धाकधूक वाढली आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपकडे सत्ता जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT