Ashok Gehlot, Gajendra Singh Shekhawat Sarkarnama
देश

Rajasthan CM Oath : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीत चर्चा कट्टर विरोधकांची; गेहलोत अन् शेखावत व्यासपीठावर एकत्र

Rajanand More

Rajasthan CM : राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा शुक्रवारी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काही केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, भाजपचे बडे नेते यावेळी उपस्थित होते. मात्र शपथविधीला सुरूवात होण्यापुर्वी चर्चा रंगली ती मावळते मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि गजेंद्र सिंह शेखावत यांची. दोघेही एकमेकांचे राजकारणातील कट्टर विरोधक व्यासपीठावर शेजारी बसून गप्पा मारताना दिसून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

पहिल्यांदाच आमदार (MLA) म्हणून निवडून आलेल्या भजनलाल शर्मा (Bhajan Lal Sharma) यांनी आज मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) शपथ घेतली. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून दीया कुमारी (Diya Kumari) आणि प्रेमचंद्र बैरवा यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी तिघांना शपथ दिली. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच मावळते मुख्यमंत्री गेहलोत हेही यावेळी उपस्थित होते.

माजी मुख्यमत्री म्हणून गेहलोत यांनी या शपथविधीला हजेरी लावली. तर शेखावत हे केंद्रीय मंत्री आहेत. राजस्थानातील कट्टर राजकीय विरोधक म्हणून या दोघांचे नाव घेतले जाते. पण या कार्यक्रमात ते दोघेही व्यासपीठावर एकमेकांच्या शेजारी बसले होते. एवढेच नाही तर तर एकमेकांशी संवाद साधतानाही दिसले. दोघांचे हे दृश्य पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यांच्याकडेच नजरा खिळल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गेहलोत आणि शेखावत यांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप-प्रत्यारोप केले होते. संजीवनी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीध्ये घोटाळ्याचा आरोप गेहलोत यांनी शेखावत यांच्यावर केला आहे. त्यावरून शेखावत त्यांनी गेहलोत यांच्यावर दिल्ली न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. सोसायटीच्या घोटाळ्यात २ लाखांहून अधिक गुंतवणुकदारांच्या फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे गेहलोत आणि शेखावत यांच्यातील चर्चेला विशेष महत्व आले आहे.

दरम्यान, भाजपने १९९ पैकी ११५ जागांवर विजय मिळत राजस्थानमध्ये सत्ता खेचून आणली आहे. तर काँग्रेसला केवल ६९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. निकालानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरविण्यासाठी भाजपला दहा दिवस लागले होते. मध्य प्रदेश, छत्तीसगडप्रमाणे भाजपने राजस्थानमध्येही धक्कातंत्राचा वापर करत नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्रिपदावर संधी दिली आहे.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT