Voting ink Sarkarnama
देश

Three rounds vote counting : दोन वेळा एका मताने विजय, पण तिसऱ्यावेळी मतमोजणी करताच निकालच पालटला; राजकीय वर्तुळात भूकंप!

Three rounds vote counting News : या प्रकारची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम राहिले. त्यानंतर एसडीएम श्रीवास्तव यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

सरकारनामा ब्युरो

Jaypur News : राजस्थानमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदाच्या मतमोजणीदरम्यान मोठा गोंधळ पहावयास मिळाला. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी जोरदार रस्सीखेच झाली. धौलपूर जिल्ह्यातील दर्र बराहना ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या मतमोजणीदरम्यान तीन वेळा मतमोजणी करण्याची वेळ आली. सुरुवातीला दोन वेळा एका मताने विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर तिसऱ्यांदा मतमोजणी करण्यात आली. त्यावेळी निकालच बदलल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे याठिकाणची परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला.

धौलपूर जिल्ह्यातील दर्र बराहना ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या मतमोजणीदरम्यान जोरदार राडा झाला. दर्र बराहना येथे मतांच्या मोजणीवरून वाद निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी मतदान केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. जिल्ह्यातील दर्र बराहना ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या मतमोजणीदरम्यान पोलिंग पथकाने दोन वेळा मतांची मोजणी केली. त्यानंतर विमला कुमारी यांना एका मताने विजयी घोषित करण्यात आले. मात्र, प्रतिस्पर्धी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी तीन मतांची मोजणी कमी झाल्याचा आरोप करत गोंधळ घातला. मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष मतदान केंद्राबाहेर जमा झाले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.

या प्रकारची माहित मिळताच पोलीस (Police) आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम राहिले. त्यानंतर एसडीएम अलका श्रीवास्तव यांनीही घटनास्थळी धाव घेतली. अखेर बयाना एसडीएम कार्यालयात पुन्हा मतमोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दर्र बराहना ग्रामपंचायतीमधून शुक्रवारी पहाटे मतपेट्या एसडीएम कार्यालयात आणण्यात आल्या. व्हिडिओग्राफीच्या देखरेखीखाली तिसऱ्यावेळी याठिकाणी मतमोजणी करण्यात आली. यामध्ये विमला कुमारी यांना 883, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी कविता कुमारी यांना 870 मते मिळाली. त्यामुळे आधी एका मताने विजयी झालेल्या विमला कुमारी यांचा विजयाचा फरक 13 मतांवर पोहोचला. त्या 13 मताने सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले.

राजस्थानमधील या ग्रामपंचायतींमध्ये (Grampanchayat) मतमोजणीदरम्यान झालेल्या गोंधळामुळे निवडणूक निकाल प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे दर्र बराहना येथे पुनर्मतमोजणीनंतर विजयाचे अंतर एका मतावरून थेट 13 मतांवर पोहोचल्याने या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT