

Latur Bank : लातूर डीसीसी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक येत्या काळात होत आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल, असे चित्र होते. मात्र, त्यानंतरच्या काळात काँग्रेसविरुद्ध भाजप अशी लढत होणार असे चित्र दिसत आहे. लातूर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता होती. मात्र, यावर्षी महायुतीकडून पॅनल उभे करण्यात आले आहे. माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी आक्रमकपणे व्यूवरचना आखली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत या निवडणूकीत रंगत भरणार आहे. निवडणूकीत काँग्रेससमोर भाजपकडून तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे मतदाराचा 'भाव' आता चांगलाच वधारला आहे.
निलंगा तालुक्यातील सोसायटी मतदारसंघासाठी यावेळेस चुरस दिसत आहे. पुन्हा एकदा याठिकाणी निलंगेकर विरुद्ध निलंगेकर अशी लढत होत असून निलंगेकर काकू-पुतण्या एकमेकाविरोधात रिंगणात उतरल्याने चुरस पाहावयास मिळणार आहे. संगीता अशोक पाटील निलंगेकर तर त्यांच्या विरोधात अरविंद पाटील निलंगेकर अशी पुतण्या विरुद्ध काकी अशी निलंगेकर विरुद्ध निलंगेकर अशी लढत होत आहे.
निलंगा तालुक्यातील सोसायटी मतदार संघासाठी 99 मतदार आहेत. याठिकाणी काँग्रेस व भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. याठिकाणी काँग्रेसच्या संगीता अशोक पाटील निलंगेकर यांच्या विरोधात भाजपकडून अरविंद पाटील-निलंगेकर अशी पुतण्या विरुद्ध काकी अशी निलंगेकर विरुद्ध निलंगेकर अशी लढत होत आहे. सतत बिनविरोध होणारी निवडणूक प्रक्रिया यंदा महायुतीकडून पॅनल उभे करण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यातील डीसीसी बँकेसाठी अन्य नऊ तालुक्यापैकी सर्वाधिक मतदार निलंगा तालुक्यातील आहेत. काँग्रेसकडून (Congress) ही निवडणुक एकहाती होणारी निवडणूक जड जाणार आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची व चिन्ह वाटप करण्यात आल्याने आता उमेदवार मतदाराच्या गाठीभेटीत मग्न दिसत आहेत.
निलंगा तालुक्यातील उमेदवाराबाबत उत्सुकता कायम होती. सोसायटी मतदारसंघातून अशोक पाटील-निलंगेकर यांच्या पत्नी संगीता पाटील निलंगेकर ह्या निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरोधात भाजपचे (BJP) प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर हे निवडणूक लढवत आहेत. सलग दहा वर्षे संचालक राहिल्याच्या नियमाने अशोक पाटील यांचा अर्ज अवैध करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या पत्नीला संधी देण्यात आली आहे.
जिल्हा सहकारी बँकेवर यापूर्वी कै. दिलीपराव पाटील निलंगेकर यांची वर्णी असायची 1997-98 मध्ये त्यांना बँकेच्या उपाध्यक्षपदी संधी मिळाली होती. त्यानंतर अशोक पाटील निलंगेकरांना संधी देण्यात आली. शिवाय निलंगा तालुक्यातून दोन संचालक असायचे यामध्ये अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून व इतर सहकारी गटातून पूर्वी कै. विश्वभर माने हे संचालक होते. त्यानंतर दोन्ही गटातून विजयकुमार पाटील यांना संधी मिळाली होती. या संधीमुळे सन 2004 ते 2007 या कालावधीत विजयकुमार पाटील हे बँकेचे अध्यक्ष होते.
काकू-पुतण्या या लढतीकडे लागले लक्ष
विधानसभा निवडणुका एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविणारे निलंगेकर कुटुंब आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने रिंगणात उतरले आहे. याठिकाणी पुन्हा एकदा निलंगेकर कुटूंब आमने-सामने आले आहे. निलंगा सोसायटी मतदारसंघातून अशोक पाटील-निलंगेकर यांच्या पत्नी संगीता पाटील निलंगेकर ह्या निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरोधात भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर हे निवडणूक लढवत आहेत. सलग दहा वर्षे संचालक राहिल्याच्या नियमाने अशोक पाटील यांचा अर्ज अवैध करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या पत्नीला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष काकू-पुतण्या या लढतीकडे लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.