BJP leader Rajiv Pratap Rudy celebrates victory in the Constitution Club of India election as senior Congress leaders Mallikarjun Kharge and Sonia Gandhi participate in voting. Sarkarnama
देश

Election News : भाजपच्या उमेदवारासाठी सोनिया गांधींसह खर्गेंचे मतदान; प्रतिष्ठेच्या निवडणुकीने इतिहास घडवला...

Rajiv Pratap Rudy Secures Victory in Constitution Club Election : कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या सचिव (प्रशासन) पदाच्या निवडणुकीत भाजप नेते राजीव प्रताप रूडी आणि संजीव बालियान यांच्यात लढत झाली.

Rajanand More

Mallikarjun Kharge and Sonia Gandhi Participate in Voting : देशभरात सध्या भाजप विरुध्द काँग्रेसमध्ये राजकीय युध्द सुरू असल्याची स्थिती आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वोट चोरीच्या मुद्द्यावरून सातत्याने निवडणूक आयोग आणि भाजपला टार्गेट करत आहेत. त्यातच मंगळवारी दिल्लीत झालेल्या एका प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपच्या नेत्याला मतदान केले. या निवडणुकीत काँग्रेसचा पाठिंबा असलेल्या भाजप उमेदवाराचा विजय झाला आहे.

भाजपचे नेते व माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी आणि त्यांच्याच पक्षातील सहकारी माजी केंद्रीय मंत्री खासदार संजीव बालियान यांच्यात ही लढत होती. दिल्लीतील प्रतिष्ठित कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या सचिव (प्रशासन) पदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. जवळपास 1200 हून अधिक मतदार असलेल्या या निवडणुकीत 600 हून अधिक आजी-माजी खासदारांनी मतदान केले.

क्लबच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने ही निवडणूक ऐतिहासिक ठरली. रूडी मागील 25 वर्षांपासून क्लबचे सचिव आहेत. या निवडणुकीतही त्यांनी बालियान यांचा 100 हून अधिक मतांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. यंदाची निवडणूक सर्वाधिक चर्चेची ठरली ती दोन्ही भाजप उमेदवारांमधील प्रतिष्ठेच्या लढतीमुळे.

खर्गे, सोनिया गांधींसह केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पियूष गोएल यांच्यासह अनेक महत्वाच्या नेत्यांनी निवडणुकीसाठी मतदान केल्याने निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्यामध्ये रूडी यांनी बाजी मारली. रूडी यांच्या पॅनेलमध्ये काँग्रेससह समाजवादी पार्टी, डावे पक्ष, तेलगू देसम आधी विरोधी पक्षांतील सदस्यंही होते. त्यामुळे विरोधकांचा पाठिंबा रूडी यांना असल्याचे मानले जात होते.

दुसरीकडे भाजपने बालियान यांच्यासाठी ताकद लावल्याची चर्चा होती. भाजपचे खासदार निशीकांत दुबे यांनी तसे सूचक विधान केल्याने निवडणुकीत रंगत वाढली होती. दुबे यांनी या निवडणुकीसाठी थेट काँग्रेसविरोधी भूमिका घेतल्याने ही लढत भाजप विरुध्द विरोधी पक्ष अशीच झाली. रूडी हे भाजपचे नेते असले तरी क्लबमध्ये त्यांचा मागील अनेक वर्षांपासूनचा दबदबा आहे. सर्वपक्षीय नेत्यांचे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्याचाच फायदा त्यांना या निवडणुकीत झाला.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT