Minta Devi viral : संसद ते सोशल मीडिया, फक्त ‘मिंता देवी’चीच चर्चा; प्रियांका गांधीही आक्रमक, अखेर सत्य आलं समोर

Bihar’s Voter ID Controversy : मिंता देवी प्रकरणावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आज आक्रमक झाल्या होत्या. त्यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक खासदारांनी पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट घालून संसदेच्या आवारात आंदोलन केले.
 Priyanka Gandhi leading protest in Parliament over Bihar voter ID showing 124-year-old woman Minta Devi
Priyanka Gandhi leading protest in Parliament over Bihar voter ID showing 124-year-old woman Minta DeviSarkarnama
Published on
Updated on

Priyanka Gandhi and MPs Stage Protest in Parliament : बिहारमधील मतदारयाद्यांच्या पुनर्पडताळणी मोहिमेवरून विरोधकांनी रान उठवले आहे. संसदेसह संसदेबाहेरही दररोज त्याविरोधात आवाज उठवला जात आहे. संसदेत यावर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी आहे. त्यातच पुनर्पडताळणी मोहिमेतील अनेक त्रुटी समोर येऊ लागल्या आहेत. मंगळवारी एक धक्कादायक माहिती समोर आली आणि विरोधकांच्या हाती आयते कोलित मिळाले.

बिहारमधील सिवान जिल्ह्यातील मतदारयादीवरून खळबळ उडाली आहे. अरजानीपूर गावांत राहणाऱ्या मिंता देवी या पहिल्यांदाच मतदारयादीत नावनोंदणी केलेल्या महिलेचे वय तब्बल 124 दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात त्या केवळ 35 वर्षांच्या आहेत. या महिलेच्या मतदार ओळखपत्रावर 15 जुलै 1900 अशी जन्मतारीख नमूद करण्यात आली आहे. त्यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे.

मिंता देवी प्रकरणावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आज आक्रमक झाल्या होत्या. त्यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक खासदारांनी पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट घालून संसदेच्या आवारात आंदोलन केले. या टी शर्टवर मिंता देवी यांचे नाव आणि फोटोसह 124 नॉट आऊट लिहिले होते. याच मुद्द्यावर खासदारांनी निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 Priyanka Gandhi leading protest in Parliament over Bihar voter ID showing 124-year-old woman Minta Devi
Donald Trump News : ट्रम्प यांची भारताला डिवचणारी धक्कादायक घोषणा; ‘पाक’ला नडणाऱ्या संघटनेला लावला ‘दहशतवादी’ टॅग

मिंता देवी यांचे ओळखपत्र आणि मतदारयादीतील नोंदणी सोशल मीडियातही प्रचंड व्हायरल होत आहे. मतदारयादीनुसार त्या जगातील सर्वाधिक ज्येष्ठ मतदार ठरल्याची टिप्पणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे. त्याची निवडणूक आयोगाने तातडीने दखल घेतली असून नेमका हा प्रकार घडला कसा याचीही चौकशी करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

मिंता देवी यांचे वय 124 वर्षे कसे नोंदविले गेले, याबाबत सिवानचे जिल्हाधिकारी आदित्य प्रकाश यांनी खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, ही टायपिंग मिस्टेक आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना चुकीची माहिती भरण्यात आली. त्यामुळे त्यांचे वय १२४ वर्षे छापून आले. व्हेरिफिकेशमध्येही ही चूक झाली आहे. आता फॉर्म-8 च्या माध्यमातून दुरूस्ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील आठवडाभरात दुरूस्ती केली जाईल.

 Priyanka Gandhi leading protest in Parliament over Bihar voter ID showing 124-year-old woman Minta Devi
Justice Verma Case : अखेर न्यायमूर्ती वर्मा यांचा मुद्दा लोकसभेत आलाच; ओम बिर्लांचा मोठा निर्णय, तिघांवर जबाबदारी

मिंता देवींचा धक्कादायक दावा

मिंता देवी यांनी मात्र धक्कादायक दावा केली आहे. आपले वय 124 छापून आल्याबाबत त्यांनी विचारले असता त्या म्हणाल्या, ‘माझे नाव लिस्टमध्ये मला कोणतीही माहिती न देता जोडण्यात आले. मला कोणतेही अधिकारी भेटण्यासाठीही आलेले नाहीत. ज्यांनी माझे वय लिहिले त्यांनाच विचारा.’ दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर देशपातळीवर पुन्हा एका निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com