Rajnath Singh  Sarkarnama
देश

BJP News: केंद्रीय संरक्षण मंत्र्यांवर कोसळला दु:खाचा डोंगर कोसळला; भाजप नेते राजनाथ सिंह यांच्या पुतण्याला भरधाव बसनं उडवलं

Defence Minister Rajnath Singh मध्य प्रदेशातील इंदूरला परतत असताना राजनाथ सिंह यांचे पुतणे प्रशांत सिंह यांना भरधाव वेगानं येणाऱ्या बसनं धडक दिली. या अपघातात प्रशांत सिंह यांचा मृत्यू झाला. अपघातातील बसचालक फरार आहे.

Deepak Kulkarni

Madhya Pradesh News: भाजपच्या गोटातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशाचे संरक्षणमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंत्री राजनाथ सिंह यांचे पुतणे प्रशांत सिंह यांचं अपघाती निधन झालं आहे.

मध्य प्रदेशातील इंदूरला परतत असताना राजनाथ सिंह यांचे पुतणे प्रशांत सिंह यांना भरधाव वेगानं येणाऱ्या बसनं धडक दिली. या अपघातात प्रशांत सिंह यांचा मृत्यू झाला. अपघातातील बसचालक फरार आहे. या अपघातात सिंह यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री सुमारे 11 वाजता घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत सिंह हे देवासहून इंदूरला परतत असताना ते काही तातडीच्या कामासाठी थांबले होते. काम संपवून ते आपल्या गाडीकडे परत येत असताना बसनं त्यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले,जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय प्रशांत सिंह मित्रांसोबत बाहेर गेले होते. देवासहून इंदूरला परतत असताना काळाने घाला घातला. प्रशांत यांनी तातडीच्या कामासाठी आपली गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि ते खाली उतरले. आपले काम झाल्यानंतर प्रशांत कारमध्ये बसण्यासाठी येत असतानाच, एका भरधाव बसने त्यांना जोरात धडक दिली. बसची धडक इतकी भीषण होती की, प्रशांत दूर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मित्रांनी प्रशांत यांना तात्काळ जवळच्याच अरबिंदो रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

प्रशांत सिंह यांच्या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक भाजप नेते तात्काळ रुग्णालयात पोहोचले होते. सोनकच्छचे आमदार राजेश सोनकर यांच्यासह अनेक नेते रात्री उशिरा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. प्रशासनानेही हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे.

प्रशांत सिंह हे उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रेवती भागातील गायघाट गावातील रहिवासी होते. त्यांचे वडील प्रदीप सिंह हे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे चुलत भाऊ आहेत; त्यामुळे प्रशांत सिंह हे राजनाथ सिंह यांचे पुतणे होते. प्रशांत हे कुटुंबात सर्वांचेच लाडके होते. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आणि शांत असल्याने लोकांसोबत त्यांची लगेच मैत्री व्हायची, असे त्यांच्या मित्रांनी सांगितले.

अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर प्रशांत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी (पोस्टमार्टम) सरकारी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन झाल्यानंतर प्रशांत यांचा मृतदेह त्यांचे मूळ गाव बलिया येथे नेण्यात आला. तिथे कुटुंबाकडून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशांत यांच्या अकाली निधनाने सिंह कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, बलिया गावात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT