flag  sarkarnama
देश

Rajsathan Vidhnsabha : राजस्थानमध्ये काँग्रेसकडून २८ महिला निवडणुकीच्या रिंगणात; सर्वाधिक युवा चेहरे आखाड्यात

Sachin Waghmare

Rajsathan Vidhnsabha Election: आगामी काळात राजस्थानात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी काँग्रेस व भाजपमध्ये मोठी चुरस पाहावयास मिळते. आगामी काळात होणाऱ्या लोकसभेची लिटमस टेस्ट म्हणू या निवडणुकीकडे पाहिले जात असल्याने दोन्ही पक्षाने आधीपासूनच जोरदार तयारी केली आहे. राजस्थानातील २०० विधानसभा जागेसाठी काँग्रेसने सर्वाधिक २८ महिलांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात २५ ते ३५ वयोगटातील युवकांना संधी दिल्याने सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.

काँग्रेसने विधानसभेच्या २०० जागंपैकी एक जागा आरएलडी या सहयोगी पक्षाला दिली आहे. काँग्रेसने २८ महिलांना उमेदवारी दिली आहे तर ३८ सर्वाधिक युवा चेहरे मैदानात उतरविले आहेत. दुसरीकडे ७१ ते ८० वयोगटातील २० तर ६१ ते ७० वयोगटातील ४६ तर, ५१ ते ६० वयोगटातील ५४ त्यासोबतच तर ४१ ते ५० वयोगटातील ९३ जणांना संधी दिली आहे. ८० पेक्षा जास्त वय असलेले चार जण नशीब अजमावत आहेत.

भाजपकडून विधानसभेच्या २०० जागंपैकी भाजपने २४ युवा चेहरे मैदानात उतरविले आहेत. तर ७१ ते ८० वयोगटातील ६ तर ६१ ते ७० वयोगटातील ५५ तर, ५१ ते ६० वयोगटातील ७८ त्यासोबतच तर ४१ ते ५० वयोगटातील ४ जणांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे. ८० पेक्षा जास्त वय असलेल्या सहा जणांना संधी दिली आहे.

काँग्रेसने दिली युवा, ज्येष्ठ उमेदवारला संधी

काँग्रेसने कठमुर मतदारसंघातून २५ वर्षीय संजना जटाव या युवा चेहऱ्याला रिंगणात उतरवले आहे तर नासिराबाद मतदारसंघातून २६ वर्षाच्या शिवप्रकाश गुज्जर यांना संधी दिली आहे. तर सुरसागर मतदारसंघातून शाहजद खान २८ वर्षीय चेहऱ्याला मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेसने बुंदी मतदार संघातून ८३ वर्षीय हरिमोहन शर्मा यांना मैदानात उतरविले असून ते सर्वात ज्येष्ठ उमेदवार आहेत.

SCROLL FOR NEXT