Nanded Government Hospital News : संतापजनक : नांदेडच्या शासकीय रुग्णालय परिसरात डुकराने तोडले मृत रुग्णाचे लचके..

Maharashtra News : धनगरवाडी (ता. जि. नांदेड) येथील तुकाराम नागोराव कसबे (वय ३५) हा क्षयरोगाने त्रस्त होता.
Nanded Government Hospital News
Nanded Government Hospital NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : विष्णुपुरीतील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आॅक्टोंबर महिन्यात २४ तासात २४ मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली होती. या प्रकारानंतर राज्यभरात खळबळ उडाली, आरोग्य, वैद्यकीय यंत्रणांसह संपुर्ण सरकार खडबडून जागे झाले. (Nanded Government Hospital News) विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आता पुन्हा एकदा नांदेडचे शासकीय रुग्णालय चर्चे आले आहे. रुग्णालय परिसरात झाडाखाली झोपेत मृत पावलेल्या एका मृतदेहाचे डुकरांनी लचके तोडल्याचा संतापजनक प्रकार शनिवारी (ता. ११) दुपारी उघडकीस आला आहे.

Nanded Government Hospital News
Uddhav Thackeray Mumbra Visit: मुंब्य्रात हायहोल्टेज ड्रामा; उद्धव ठाकरेंचा ताफा पोलिसांनी रोखला

नवजात बालकासह रुग्णांच्या मृत्यूच्या घटनेने (Nanded) नांदेडचे विष्णुपुरी येथील शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील आरोग्य सेवेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात गाजला होता. याचे पडसाद राज्यभरात उमटले होते. आता परत रुग्णालय परिसरात झाडाखाली झोपलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे डुकराने लचके तोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (Marathwada) दरम्यान, रुग्णांचा मृत्यू आधीच झाला असल्याची शवविच्छेदनामध्ये आढळून आल्याची माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांनी दिली.

धनगरवाडी (ता. जि. नांदेड) येथील तुकाराम नागोराव कसबे (वय ३५) हा क्षयरोगाने त्रस्त होता. त्यामुळे त्यास रुग्णालयात ता. ३० आॅक्टोंबरला श्वसन रोग विभागात वार्ड क्रमांक १४ दाखल केले होते. त्याला क्षयरोग आणि दम लागण्याचा त्रास होता. (Maharashtra) दरम्यान, त्याला बरे वाटू लागल्याने गुरूवारी (ता. नऊ नोव्हेंबर) तो घरी गेला. त्याच्या नातेवाईकांनी त्याला घरी नेल्यानंतर पुन्हा तो शुक्रवारी (ता. दहा) परभणी येथील त्याच्या काकाकडे जाण्यासाठी नांदेडच्या रेल्वे स्थानकावर त्याला नातेवाईकांनी सोडले.

परंतु त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने परत तो स्वतः विष्णुपुरी रुग्णालयात आला व तेथेच रुग्णालय परिसरात झाडाखाली झोपला. पण रात्रीच्या वेळी झोपेत त्याचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. नांदेड ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मयताचे वडील नागोराव कसबे यांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रुग्णालय परिसरात एका व्यक्तीभोवती डुकरे लचके तोडत असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांकडून मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ त्यास उचलून अपघात विभागात आणले. मात्र, तपासले असता तो आधीच मृत्यू पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर कायदेशीर कार्यवाही करत पोलिसांना कळविण्यात आले आणि पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. त्या अहवालात त्याचा मृत्यू अगोदरच झालेला आहे. मृत पावल्यानंतर जखमा झाल्या आहेत. त्या रुग्णाला दोन दिवस अगोदरच रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती, अशी माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांनी दिली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com