Kumar Vishwas Sarkarnama
देश

Rajya Sabha Election 2024 : कुमार विश्वास यांना राज्यसभेची उमेदवारी? भाजप देणार धक्का...

Rajanand More

New Delhi : लोकसभा निवडणुकीआधी देशभरात राज्यसभेचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकीत भाजप धक्का देण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षातून राजकारणात दाखल झालेले कवी कुमार विश्वास यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. भाजपने तयार केलेल्या उमेदवारांच्या यादीत त्यांच्याही नावाचा समावेश केल्याची माहिती आता समोर आली आहे. (Rajya Sabha Election 2024)

कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांनी काही वर्षांपुर्वीचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याशी मतभेद झाल्यानंतर ते सक्रीय राजकारणापासून दूर गेले आहेत. पण सोशल मीडियातून ते केजरीवालांसह आप नेत्यांवर निशाणा साधत असतात. मागील काही वर्षांत त्यांची भाजप (BJP) नेत्यांशी जवळीक वाढत असल्याची चर्चा होती. त्यातूनच आता त्यांचे नाव राज्यसभेच्या यादीत आल्याची चर्चा आहे.

उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या दहा जागा असून तिथूनच कुमार विश्वास यांना उमेदवारी देण्याची संकेत मिळत आहेत. यूपी भाजपने 35 जणांची नावे निश्चित केल्याचे समजते. या यादीत त्यांच्याही नावाचा समावेश आहे. सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत राज्यसभेच्या उमेदवारांबाबत चर्चा झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उत्तर देशातून सुधांशु त्रिवेदी यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्यासोबत कुमार विश्वास यांचे नावही आघाडीवर आहे. मात्र, याबाबत भाजपकडून अद्याप अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही. राज्यात भाजपला साज जागा मिळू शकतात. तर तीन जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार निवडून येऊ शकतात. भाजपकडून आठवा उमेदवार निवून आणण्यासाठीही प्रयत्न केले जाऊ शकतात, अशीही चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT