Lok Sabha Election 2024 : मुलाकडूनच कमलनाथ यांचा पत्ता कट; स्वत:चीच उमेदवारी केली घोषित

Nakul Nath : कमलनाथ हे लोकसभा निवडणुकीत उमेदवार असतील, अशी जोरदार चर्चा आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांचे पुत्र नकुल नाथ यांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर केली.
Kamal Nath, Nakul Nath
Kamal Nath, Nakul NathSarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मध्य प्रदेशाच्या वेशीवर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने कंबर कसली असताना नेत्यांमध्ये समन्वय नसल्याचे समोर आले आहे. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेत्यांना मैदानात उतरवण्याची तयारी असल्याची चर्चा आहे. त्यानुसार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. पण त्यांच्या मुलानेच वडिलांचा पत्ता कट केला आहे. (Lok Sabha Election 2024)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) काँग्रेसचे (Congress) एकमेव खासदार नकुलनाथ यांनी सोमवारी आपली उमेदवारी जाहीर केली. विशेष म्हणजे यावेळी कमलनाथही (Kamal Nath) व्यासपीठावर उपस्थित होते. छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. हा मतदारसंघ कमलनाथ यांचा गड मानला जातो. या मतदारसंघाचे त्यांनी नऊवेळा प्रतिनिधित्व केले आहे.

Kamal Nath, Nakul Nath
ED Raid Delhi : मोठी बातमी ! केजरीवालांची चौकशीला दांडी ? ईडी अ‍ॅक्शन मोडवर; बड्या नेत्याच्या घरी छापा

कमलनाथ हे याच मतदारसंघातून आमदार आहेत. तर मुलगा नकुलनाथ (Nakul Nath) हे खासदार आहेत. उर्वरित २८ मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. सोमवारी परासिया येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना नकुलनाथ म्हणाले, विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) अनेक उमेदवार असल्याने गटबाजी होते. पण लोकसभेची निवडणूक वेगळी असते. तिथे गटबाजी नसते. केवळ एकच उमेदवार असतो. मी तुमचा उमेदवार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून वडील की मुलगा उतरणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेवर नकुलनाथ यांनी एकप्रकारे पडदा टाकला आहे. कमलनाथ हे निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केेले आहे. नकुलनाथ यांनी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीआधीच आपल्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली होती. आताही त्यांनी लोकसभेची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे.

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यानंतर कमलनाथ यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्यासह दिग्विजयसिंह यांच्या नेतृत्वाचा अस्त झाल्याचे मानले जात आहे. त्यातच मुलानेही वडिलांच्या उमेदवारीबाबत सुचक वक्तव्य केले आहे.

Kamal Nath, Nakul Nath
Lok Sabha Election 2024 : एकट्या भाजपला निवडणुकीत किती जागा मिळणार? मोदींनी लोकसभेतच सांगितला आकडा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com