Swati Maliwal, Arvind Kejriwal, sanjay Singh Sarkarnama
देश

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या निवडणुकीत ‘आप’चा दबदबा; तीन उमेदवार बिनविरोध

Rajanand More

New Delhi : राज्यसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दबदबा राहिला. दिल्लीतून देण्यात आलेल्या तीनही उमेदवारांचा बिनविरोध राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्याविरोधात एक अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे तिघांच्या विजयाची घोषणा करण्याची केवळ औपचारिकता उरली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून सायंकाळी याबाबत घोषणा केली जाईल.

कथित मद्य घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले खासदार संजय सिंग (Sanjay Singh) पुन्हा राज्यसभेत जाणार आहेत. तुरुंगात असतानाही आपने (AAP) त्यांना उमेदवारी देत एकप्रकारे केंद्र सरकारला सूचक इशारा दिला होता. न्यायालयानेही त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी परवानगी दिली होती. आता विजयाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी ते काही वेळासाठी तुरुंगातून बाहेर येतील.

संजय सिंग यांच्याप्रमाणेच दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) बिनविरोध विजयी झाल्या आहेत. त्या पहिल्यांदाच राज्यसभेत (RajyaSabha) जातील, तर तिसरे उमेदवार नारायण दास गुप्ता यांना राज्यसभेवर दुसऱ्यांदा संधी मिळणार आहे. गुप्ता आणि सिंग यांची मुदत 27 जानेवारीला संपणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तीन जागांसाठी 19 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. अर्ज भरण्याची मुदत 9 जानेवारी होती. यादरम्यान केवळ तिघांचे अर्ज आले. त्याचवेळी निवडणूक बिनविरोध होणार, हे स्पष्ट झाले होते. अर्जांची छाननी 10 जानेवारीला पार पडली, तर अर्ज मागे घेण्याची मुदत 12 जानेवारी म्हणजे आजपर्यंत आहे. तिघांचेही अर्ज छाननीत वैध ठरले. त्यामुळे आता आजच त्यांना विजयाचे प्रमाणपत्र मिळू शकते.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT