Maharashtra Congress : काँग्रेसला दक्षिण विजय मिळवून देणारा ‘स्ट्रॅटेजिस्ट’ आता महाराष्ट्राच्या मोहिमेवर

Sunil Kanugolu : रणनीतीकार सुनील कानुगोलू यांचा कर्नाटक, तेलंगणा विजयात मोलाचा वाटा...
Sunil Kanugolu
Sunil KanugoluSarkarnama
Published on
Updated on

Assembly News : कर्नाटक आणि तेलंगणच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवत विरोधकांना धूळ चारली. पण त्याचवेळी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसची उत्तरेकडील राज्यांसाठी काँग्रेसची रणनीती फसत असल्याची चर्चा आहे. दक्षिणेतील दोन राज्यांसाठी निवडणूक मोहिमेची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसचा एक चेहरा महत्त्वाचा मानला जात आहे.

काँग्रेसच्या (Congress) विजयात मोलाचा वाटा होता तो, रणनीतीकार सुनील कानुगोलू. (Sunil Kanugolu) पण काँग्रेसने त्यांना लोकसभा निवडणुकीपासून (LokSabha Election) दूर ठेवल्याचे समजते. त्यांच्यावर महाराष्ट्रासह हरियाना या दोन राज्यांची जबाबदारी सोपवली जाणार आहे. त्यांना सुरुवातीला काँग्रेसच्या टास्क फोर्स 2024 मध्ये समाविष्ट करण्यात आले होते.

Sunil Kanugolu
Manohar Parrikar : पर्रीकरांवर भाजपच्या मंत्र्यांकडूनच भ्रष्टाचाराचे आरोप; पक्षात पडले दोन गट?

महाराष्ट्र आणि हरियानामध्ये पुढील सात महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सध्याच्या राजकीय स्थितीनुसार काँग्रेस दोन्ही राज्यांमध्ये मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे. त्यासाठी कानुगोलू यांच्यावर रणनीती ठरवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पण लोकसभेच्या मोहिमेत त्यांचा समावेश नसल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रसेच्या काही वरिष्ठ नेत्यांनीही कानुगोलू यांना लोकसभेच्या निवडणुकीपासून दूर ठेवल्याचा फटका बसू शकतो, असे मत व्यक्त केले आहे. पण त्याचवेळी दोन्ही महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपला पराभूत करणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. कानुगोलू हे कर्नाटकमध्येही सध्या सक्रिय असून ते मुख्यमंत्र्यांचे सल्लागार आहेत.

दरम्यान, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील निवडणुकीसाठी कानुगोलू यांची प्राथमिक चर्चा झाली होती. पण कमलनाथ आणि अशोक गेहलोत यांनी त्यांच्या समावेशावर फुली मारली होती. त्याचा फटका काँग्रेसला दोन्ही राज्यांत बसला, तर दक्षिणे कानुगोलू यांना मोकळीक देण्यात आली होती. ते भाजपच्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीचा एक भाग होते.

R...

Sunil Kanugolu
MP Sujay Vikhe: निमंत्रणच नाही, तरीही ते म्हणतात, अयोध्येला जाणार नाही; विखेंचा काँग्रेसला टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com