WhatsApp ban SArkarnama
देश

WhatsApp ban : खासदाराकडून दररोज सकाळी तब्बल 5 हजार लोकांना मेसेज; मजकूर काय? WhatsApp ने उचललं मोठं पाऊल

Ram Gopal Yadav WhatsApp : रामगोपाल यादव यांच्याबाबतीत व्हॉट्सअपने हा निर्णय का घेतला याबाबतचा खुलासा अद्याप झालेला नाही.

Rajanand More

WhatsApp temporary restriction : मागील काही वर्षांत सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातही व्हॉट्सअॅपचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. सर्वसामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षही त्यात मागे नाहीत. दररोज पहाटेपासून शुभ सकाळ, सुविचार आदी मेसेजचा भडिमार होतो. एका ज्येष्ठ खासदारांकडून तर दररोज सकाळी तब्बल ५ हजार लोकांना असे मेसेज पाठविले जात असल्याचे समोर आले आहे.

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव, खासदार रामगोपाल यादव असे त्यांचे नाव आहे. देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेत्यांपैकी ते एक आहेत. १९९२ पासून ते संसदेच्या कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य आहेत. त्यांच्याकडून दररोज पाच हजार लोकांना मेसेज पाठविले जात होते. पण आता त्यावर व्हॉट्सअपने तात्पुरती बंदी घातली आहे.

यादव यांनी एक्सवर याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपण दररोज सकाळी सुमारे पाच हजार लोकांना सुप्रभातचे संदेश पाठवत होतो आणि त्यांच्या चांगल्या दिवसासाठी प्रार्थना करत होतो. व्हॉट्सअॅपने ३१ जुलैपर्यंत माझ्याकडून पाठविण्यात येणाऱ्या मेसेजवर बंदी घातली आहे. त्यामुळे तोपर्यंत मी संदेश पाठवू शकणार नाही.

रामगोपाल यांच्या या पोस्टनंतर चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या अनेक समर्थकांनी पोस्टवर प्रतिक्रिया देताना ही बंदी हटविण्याची मागणी केली आहे. अनेकांनी व्हॉट्सअॅपने ही बंदी का घातली, याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. लवकरात लवकर मेसेज सुरू करावेत, अशी अपेक्षाही काहींनी व्यक्त केली.

काय आहे नियम?

व्हॉट्सअपच्या धोरणानुसार एकाचवेळी मोठ्या संख्येने संदेश पाठविल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यावर तात्पुरती बंदी आणली जाऊ शकते. यापूर्वीही असे प्रकार घडले आहे. यादव यांच्याबाबतीत व्हॉट्सअपने हा निर्णय का घेतला याबाबतचा खुलासा अद्याप झालेला नाही. कारण अनेक राजकीय नेते, राजकीय पक्षांकडून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एकाचवेळी हजारो लोकांना मेसेज पाठविले जातात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT