

India longest serving prisoner : भारतात सर्वाधिक काळ तुरूंगवास भोगलेला गुन्हेगार नुकताच तुरुंगातून बाहेर आला आहे. दोन पत्नींसह चिमुकल्या लेकीची हत्या करणारा हा नराधम तब्बल ३७ वर्षे शिक्षा भोगत होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप झाल्याचेही तो म्हणाला.
साईबन्ना निनगप्पा नाटीकर असे या व्यक्तीचे नाव आहे. कर्नाटकातील कलबुर्गी येथील तो रहिवासी असून सध्याचे त्याचे वय ७७ वर्षे एवढे आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी (ता. ६) त्याची बेंगलुरू मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. सुटकेनंतर मीडियाशी बोलताना त्याने झालेल्या चुकीची मोठी किंमत मोजावी लागल्याचे सांगितले.
नेमकं काय घडलं?
कर्नाटकातील विविध तुरुंगातील २४ गुन्हेगारांची त्यांच्या चांगल्या वागणुकीबद्दल सुटका करण्यात आली. त्यांचे सरकारकडून पुनर्वसनही केले जाणार आहे. यामध्ये साईबन्ना याचाही समावेश आहे. अटक होण्यापूर्वी तो कर्नाटक राज्य सहकारी विपनन फेडरेशनमध्ये कामाला होता. १९८८ मध्ये त्याने पहिल्या पत्नीची हत्या केली होती. पत्नीचे अफेअर असल्याचा संशय त्याला होता. या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
साईबन्ना याला १९९४ मध्ये पॅरोल मिळाला. शिक्षेनंतर पहिल्यांदाच जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याने काही दिवसांतच दुसरं लग्न केले. त्यांना एक मुलगीही होती. काही आठवड्यांनंतर दुसऱ्या पत्नीवरही त्याने संशय घेतला. या संशयातून त्याने पत्नीही लेकीचीही हत्या केली. पत्नीला दुसऱ्या पुरूषासोबत पाहिल्याचा दावा साईबन्ना याच्याकडून केला जातो. त्याच रागातून हत्या केल्याचे त्याने सांगितले. या गुन्ह्यातही त्याला शिक्षा झाली. त्यानंतर तब्बल ३७ वर्षांनी त्याची सुटका झाली. तो सर्वाधिक काळ तुरुंगात असणारा कैदी होता, असे सांगितले जाते.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नाटीकर याने मी केलेली चूक कुणीही करू नये, असे सांगितले. तो म्हणाल्या, तुरुंगात गेल्यानंतर माझे आयुष्य तिथेच गेले. माझी लोकं, नोकरी, घरदार गेले. दहा एकर जमीन गेली. रागाच्या भरात केलेल्या चुकीमुळे कुटूंब उध्वस्त झाले. मी ३७ वर्षे तुरूंगात काढली. दरम्यान, स्थानिक कोर्टाने नाटीकर याला २००३ मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. नंतर कर्नाटक हायकोर्टाने या शिक्षेला जन्मठेपेत बदलले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.