Ram Mandir Donation Case : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या मंदिरातील कथित देणगीप्रकरणावरून देशभरात चर्चा सुरू असतानाच, मंदिर ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर महिला अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पदासाठी योग्य उमेदवाराची शिफारस करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संभाव्य उमेदवारांमध्ये महिला अधिकाऱ्याच्या नावाचीही चर्चा असल्याचे सांगितले जात आहे.
राम मंदिर (Ram Mandir) निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी अयोध्या येथे मंदिराची पाहणी करून कथित देणगीप्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ही घटना मंदिरासाठी आणि संबंधित सर्वांसाठी 'कलंक' असल्याचे त्यांनी म्हटले.
त्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत यासाठी मंदिराच्या (Tamples) व्यवस्थापन प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येतील. कथित देणगीप्रकरण लज्जास्पद असून त्यामुळे सर्वांनाच अपमानित झाल्यासारखे वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मंदिर ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरील नियुक्ती शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा नृपेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केली. राम मंदिर ट्रस्टच्या सीईओ पदावर सेवानिवृत्त अधिकारी असेल असे संकेत त्यांनी दिले. मात्र महिला अधिकाऱ्याच्या नियुक्तीबाबत सुरू असलेल्या चर्चेवर त्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.
दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी या कथित देणगीप्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्थापन करण्यात येणाऱ्या विशेष तपास पथकाकडून (SIT) करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
सध्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या SIT मध्ये उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने त्या चौकशीवर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट विसर्जित करण्याचीही मागणी त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.