Ram Mandir Trust : अयोध्या राम मंदिर ट्रस्टमध्ये मोठा निर्णय; चंपत राय, अनिल मिश्रा यांचे राजीनामे मंजूर, पुढे काय होणार?

Ayodhya temple trust leadership changes: श्रीराम मंदिरातील दानप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात एसआयटीच्या अंतिम अहवालानंतर 22 जुलैला पुढील बैठक, अन्य प्रशासकीय नियुक्त्यांवरही होणार असल्याचा निर्णय झाला.
Ram Mandir Trust accepts Champat Rai resignation; Krishnamohan gets additional charge as General Secretary
Ram Mandir Trust accepts Champat Rai resignation; Krishnamohan gets additional charge as General SecretarySarkarnama
Published on
Updated on

Ram Mandir Trust meeting latest update: अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील कथित दानप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी दिलेले राजीनामे विश्वस्त मंडळाच्या बैठकीत औपचारिकरीत्या स्वीकारण्यात आले.

तसेच नव्याने विश्वस्त मंडळात सहभागी झालेल्या कृष्णमोहन यांच्याकडे सरचिटणीसपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली. ट्रस्टचे खजिनदार गोविंददेव गिरी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

दानप्रकरणानंतर ट्रस्टच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत असताना या बैठकीकडे विशेष लक्ष लागले होते. बैठकीला श्रीराम (Ram Mandir) जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांच्यासह नऊपैकी सात विश्वस्त उपस्थित होते. चंपत राय आणि अनिल मिश्रा मात्र बैठकीला उपस्थित नव्हते.

अयोध्यातील (Ayodhya) श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने राजीनामे स्वीकारल्यानंतर कृष्णमोहन यांच्याकडे सरचिटणीसपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, कथित दानप्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) चौकशी करत असून अंतिम अहवाल सादर झाल्यानंतर 22 जुलै रोजी पुन्हा विश्वस्त मंडळाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत पुढील प्रशासकीय नियुक्त्यांबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Ram Mandir Trust accepts Champat Rai resignation; Krishnamohan gets additional charge as General Secretary
Digvijaya Singh On Ram Mandir Scam : राम मंदिर देणगी घोटाळ्यात काँग्रेस आक्रमक; दिग्विजय सिंह यांची ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या अटकेची मागणी

बैठकीनंतर गोविंददेव गिरी यांनी सांगितले की, ट्रस्टच्या घटनेनुसार एखाद्या विश्वस्ताने राजीनामा दिल्यानंतर तो आपोआप ग्राह्य धरला जातो. त्यामुळे विश्वस्त मंडळाला तो नाकारण्याचा अधिकार नसून बैठकीतील मंजुरी ही केवळ औपचारिक प्रक्रिया होती.

Ram Mandir Trust accepts Champat Rai resignation; Krishnamohan gets additional charge as General Secretary
Ram Mandir SIT Investigation : राम मंदिर देणगी अपहार प्रकरण तापलं; CCTV बंद करून कोट्यवधींची चोरी, भाजपवर अखिलेश यादवांचा हल्लाबोल

दानप्रकरणावर प्रतिक्रिया देताना गोविंददेव गिरी यांनी नाराजी व्यक्त केली. चोरी मोठी की लहान हा वेगळा मुद्दा असला, तरी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणे खेदजनक असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित प्रकरणातील दोषींची ओळख पटून त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत पदावर राहणे योग्य ठरणार नाही, अशी भावना असल्यामुळेच चंपत राय यांनी राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दानप्रकरण उघडकीस आल्यानंतर मंदिराला दान म्हणून मिळालेल्या अनेक मौल्यवान वस्तू गायब झाल्याचा दावा विविध राजकीय नेत्यांनी केला होता. मात्र, गोविंददेव गिरी यांनी हे दावे फेटाळले. मंदिराला एकूण 2,800 वस्तू दान स्वरूपात प्राप्त झाल्या असून त्या सर्व सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी काही वस्तू माध्यमांसमोरही सादर करण्यात आल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com