Sanjay Raut, Uddhav Thackeray, Acharya Satyendra Das Sarkarnama
देश

Ram Mandir : निमंत्रणाच्या वादावर अखेर मुख्य पुजारीच बोलले; उद्धव ठाकरे, राऊतांवर संतापले

Acharya Satyendra Das : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केलं कौतुक...

Rajanand More

Ram Mandir Politics : अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यावरून देशभरात मोठे राजकारण सुरू आहे. या सोहळ्याला निमंत्रण देण्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख (उध्दव ठाकरे गट) उध्दव ठाकरे यांना अद्याप निमंत्रण मिळालेले नाही. खासदार संजय राऊत यांनीही यावरून भाजप या सोहळ्याचा राजकीय इव्हेंट करत असल्याची टीका केली आहे. मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांवरून यावरून त्यांना फटकारले आहे.

मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास (Acharya Satyendra Das) यांनी निमंत्रणावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘एएनआय’शी संवाद साधला. केवळ राम भक्तांनाच निमंत्रण देण्यात आले असल्याचे दास यांनी सांगितले. यावर बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं कौतुक केलं. तसेच भाजपकडून (BJP) या सोहळ्याचं राजकारण (Politics) केलं जात असल्याच्या आरोपालाही परखडपणे उत्तर दिलं आहे.

दास म्हणाले, भगवान रामाच्या नावाचा भाजपकडून राजकीय वापर केला जात असल्याचे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. आपल्या पंतप्रधानांचा सर्वत्र आदर केला जातो. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात खूप भरीव काम केलं आहे. हे राजकारण नाही. ही त्यांची भक्ती आहे.

संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना दास यांनी त्यांना खडसावले. संजय राऊत यांना एवढा त्रास होत आहे की, ते व्यक्तही होऊ शकत नाही. हे तेच आहेत, ज्यांनी निवडणुकीत भगवान रामाच्या नावाचा वापर केला. ज्यांचा रामावर विश्वास आहे, ते आज सत्तेत आहेत. ते काहीही बोलून भगवान रामाचा अपमान करत आहेत, अशा शब्दांत दास यांनी राऊतांवर टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, भाजपकडून आता केवळ रामाला निवडणुकीची उमदेवारी जाहीर करणे बाकी असल्याची टीका राऊत यांनी केली होती. भाजपकडून या सोहळ्याचा राजकीय भांडवल केले जात असल्याचेही ते म्हणाले होते. उध्दव ठाकरे यांनीही या सोहळ्याचं राजकारण करू नये, या शब्दांत भाजपवर टीकेचा बाण सोडला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT